मुंबई : सेवेत असताना मरण पावलेल्या राज्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना अखेर दिलासा मिळाला असून राज्यातील ६८५ कुटुंबीयांना ४ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. ही रक्कम शिक्षणाधिकारी कार्यालयांकडून तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचे कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी फेब्रुवारीमध्ये राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निधीअभावी ५ वर्षे रखडलेली आर्थिक मदत तातडीने देण्याची विनंती केली होती.
अनुदानित संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा सेवेत असताना मृत्यू आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे ६0 हजारांची विशेष आर्थिक मदत केली जाते. तथापि, वित्त विभागाकडून योग्य प्रमाणात तरतूद न झाल्याने राज्यातील मृत झालेल्या शेकडो शिक्षक व शिक्षकेतरांचे कुटुंबीय या लाभापासून वंचित होते. शासनाच्या नियोजनशून्य अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यास विलंब होत होता.
याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास शासनाविरोधात 'भीक मांगो' आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर सरकारने ६८५ कुटुंबीयांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर केला.