मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने टीडीएसचे ७८ कोटी थकवल्याचे व ते वसूल करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने पालिकेच्या बँक खात्यावर टाच आणल्याची लाजीरवणी बाब उजेडात आली आहे. प्राप्तीकर विभागाच्या पथकाने पालिकेच्या चर्चगेट येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील बँक खाते जप्त करून त्यातील ७८ कोटी रुपये वसूल केले, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. देशातील सर्वात मोठ्या व अ प्लस असा दर्जा असलेल्या महानगरपालिकेवर अशी कारवाई झाल्याने पालिकेचे हसे होत आहे.
प्राप्तीकर विभागाची टीडीएस शाखा मुंबई महापालिकेकडून दरवर्षाला जवळपास ३00 कोटी रुपये प्राप्त करते. पालिका प्रशासन आपल्या कर्मचार्यांकडून टीडीएस कपात करते, मात्र ती रक्कम सरकारकडे जमा करत नाही. केवळ एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हा प्रकार घडत असल्याचे प्राप्तीकर विभागाच्या कारवाईतून उघड झाले. टीडीएस भरणा करण्यात पालिकेची ही उदासीनता योग्य नसल्याचे मत प्राप्तीकर विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने व्यक्त केले. पालिका प्रशासन २00७ पासून टीडीएसची रक्कम भरणा करण्यात विलंब करत आहे. याबाबत टीडीएस विभागाने फेब्रुवारी महिन्यात ७८ कोटी भरणा करण्याची सूचना करत पालिकेला अंतिम नोटीस बजावली होती. अनेक नोटिसा, ई-मेल्स आणि फोन कॉल्स करूनही रक्कम भरणा करण्याकामी पालिकेने प्रतिसाद न दिल्याने अखेर प्राप्तीकर विभागाने पालिका प्रशासनाचे बँक खाते जप्त करून ७८ कोटी वसूल केले. टीडीएस नियमावलीनुसार कर्मचार्यांच्या पगारातून टीडीएसची रक्कम कापली जाते. ती रक्कम संबंधित आस्थापनेने पुढील महिन्याच्या सात दिवसांत सरकारकडे जमा करणे बंधनकारक आहे.