पालिका आयुक्तांच्या मानसिक स्थितीची तपासणी करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका आयुक्तांच्या मानसिक स्थितीची तपासणी करा

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव - 
मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांची मानसिक स्थीती चांगली नसल्याने ते बेजबाबदार वकतव्य करत आहेत. त्यांच्या मानसिक स्थीतीची तपासणी पालिकेच्या रूग्णालयातुन करावी अशी मागणी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. 


पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी आरेबाबत वादग्रस्त वकतव्य केले होते. त्यानंतर कुंटे यानी भायखळा राणीबाग़ येथे आयोजीत केलेल्या ल्याक्मे फ्याशन शो साठी पालिकेची परवानगी गरजेचे नसल्याचे वक्तव्य केले आहे. राणीबाग़ ही पालिकेच्या अखत्यारीत येते. राणी बाग़ येथे भाऊ दाजी लाड संग्रहालय आहे. हे संग्रहालय पालिकेच्या जागेवर असले तरी बजाज ट्रस्ट हे संग्रहालय चालवीत आहे. या ट्रस्टने पालिकेची परवानगी न घेता शो चे आयोजन केले होते. तसेच पालिका आयुक्त कुंटे यानी स्तापत्य समितीच्या नगरसेवकांना तुम्ही दत्तक वस्ती मधील संस्थाकडून हफ्ते वसूल करता मी तुमच्या दत्तक वस्तीबाबत कोणत्याही तक्रारी ऐकून घेणार नाही असे वक्तव्य केले आहे. याचा निषेध करत संदीप देशपांडे यानी हरकतीचा मुद्दा उपस्थीत केला होता.

यावर सर्वपक्षीय नगरसेवकानी नाराजी व्यक्त करत आयुक्तांचा निषेध केला. आयुक्त फ़क्त पेज थ्रीच्या लोकांसाठी काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आयुक्त बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. ते बदली होणार म्हणून अशी वकतव्य करत असू शकतात. यामुळे आयुक्तांची मानसीक स्थीती निट नसल्याचे समोर येत असल्याने त्यांची पालिकेच्या केईएम् रुग्णालयात तपासणी करावी. नगरसेवकांना हफ्ते वसूल करतात असे वक्तव्य करणारे पालिका आयुक्त धिकारी भ्रष्टाचार करताना पकडले जातात तेव्हा गप्प असतात अशी टीका करण्यात आली. आयुक्तांच्या या दुटप्पी पणाबाबत आणि केलेल्या वक्तव्या बाबत आयुक्तानी स्पष्टीकरण करावे अशी मागणी करण्यात आली. परंतू आयुक्त स्थायी समिती मध्ये स्पष्टीकरण करण्यास आले नसल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages