स्वाईन फ्ल्यूमुळे एकूण २२ जणांचा बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वाईन फ्ल्यूमुळे एकूण २२ जणांचा बळी

Share This
मुंबई : 'स्वाईन फ्ल्यू'चा कहर वाढतच चालला असून, मंगळवारी एका ३0 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. विरारला राहणारी ही महिला सात महिन्यांची गर्भवती होती. तिला २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. नंतर तिला २ मार्चला केईएममध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने तिचा ८ मार्चला मृत्यू झाला. 'स्वाईन'चे मंगळवारी ६९ नवे रुग्ण आढळले असून, एक रुग्ण मुंबईबाहेरील आहे. ६९ पैकी ३४ पुरुष व ३५ महिला रुग्ण आहेत तर मुंबईबाहेरील रुग्णही महिला आहे. १९ जानेवारीपासून स्वाईन फ्ल्यूचे मुंबईत ९१८ व मुंबईबाहेरील १२३ रुग्ण आढळले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages