भाजपकडून अमर साबळेंना राज्यसभेची लॉटरी! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपकडून अमर साबळेंना राज्यसभेची लॉटरी!

Share This
सहस्त्रबुद्धे, शायना, रहाटकर शर्यतीत मागे पडले
एकही अर्ज न आल्याने बिनविरोध निवड ; अधिकृत घोषणा १३ मार्च रोजी 

मुंबई १० - भाजपकडून राज्यभेसाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विनय सहस्त्रबुद्धे, शायना एनसी, व विजया रहाटकर यांना मागे टाकून भाजपच्याच अनुसूिचत जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अमर साबळे यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख असतानाही राष्ट्रवादी  काँग्रेस, काँग्रेस या विरोधीपक्षांकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी एकही अर्ज करण्यात आला नसल्याने साबळे यांचा राज्यसभेसाठीचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.उद्या ११ रोजी अर्जाची छाननी होणार असून १३ तारखेला माघार घेण्याची तारीख असून त्याचवेळी साबळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे .  

साबळे यांना ऐनवेळी उमेवादी देऊन भाजप पक्षश्रेष्ठींनी पक्षाचा सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीत साबळे यांना पिंपरी चिंचवडमधून जागा देण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु ही जागा मित्रपक्षांना सोडण्याच्या निर्णयामुळे साबळे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून भाजपने ही जागा रिपाइंला दिली होती. मात्र पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्याने साबळे यांना राज्यसभेची संधी मिळाली आहे. 
काँग्रेसचे नेते मुरली देवरा यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. यामुळे भाजपकडून ज्येष्ठ संघटक विनय सहस्त्रबुद्धे यांची उमदेवारी निश्चित समजली जात होती. सहस्त्रबुद्धे यांना उमेदवारी न दिल्यास भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर तसेच महिला नेत्या शायना एनसी यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल, असे बोलले जात असताना शेवटच्या क्षणी भाजपने अनपेिक्षत उमेदवार देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 

 मागील पंधरा वर्षांपासून साबळे हे  भाजपच्या अनुसूिचत जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सांभाळत आहेत. पक्षाशी अतिशय एकनिष्ठ असलेल्या साबळे हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.  मुळचे बारामतीकर असलेल्या  साबळे यांनी आपल्या उमेदीच्या  काळात वार्ताहर म्हणूनही काम केले होते. पण, सामाजिक कामाची आवड असल्याने त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यातील संघटकाचे गुण हेरून मुंडे यांनी त्यांच्याकडे अनुसुिचत विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची  जबाबदारी दिली होती. गेली १५ वर्षे मी पक्षाचे निष्ठेने काम केले. भाजपने आत्तापर्यंत आपल्यावर जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिला. पक्षाने खासदारपद देऊन माझ्या कामिगरीचे चीज केले अशी  भावना साबळे यांनी  व्यक्त केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages