मुंबई, दि 10 - मुंबईत सुरक्षेसाठी 6020 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून संबंधित कंपनी याबाबत सर्वेक्षण करते आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज विधानसभेत दिली.मुंबईत वाहतूक नियंत्रण व सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येण्याबाबत सरकारकडून कोणती कार्यवाही करण्यात येते आहे याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभेत भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह दोन्हीकडील सदस्यांनी विचारला होता.
त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले की, मुंबईत सार्वजनिक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नेमलेल्या उच्च् स्तरीय शक्ती प्रदान समितीने 5जानेवारी 2015 मध्ये झालेल्या बैठकीत करार करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सरकारने या 7 -2- 2015 ला 6020 कमेरे बसविण्याचे कार्यादेशही काढले आहेत. या नुसार सध्या कॅमेरे बसविणारी कंपनी ठिकाणांबाबत सर्वेक्षण करीत आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
