कॉंग्रेसच्या 6 नगरसेविका निलंबित
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या नगर्सेवकाना स्थायी समितीने अधिकच्या मंजूर केलेल्या निधिचे सर्व नगर्सेवकाना समान वाटप केले जात नसल्याने कोंग्रेस राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या नगर्सेवकानी निषेध करत सभागृहात गोंधळ केला. यावेळी कोंग्रेसच्या 6 महिला नगर्सेविकाना निलंबित करण्यात आले.
मुंबई महानगर पालिकेच्या सन 2015-16 च्या 33 हजार 500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने 500 कोटी रुपयांची अधिकची तरतूद केली आहे. या 500 कोटी पैकी 100 कोटी रुपये बेस्ट्ला देण्यात आले. उरलेले 400 कोटी रुपयांचे सर्व नगर्सेवकाना समान वाटप न करता भाज्पाला 32 कोटी, मनसेला 5 कोटी, राष्ट्रवादीला 5 कोटी, कोंग्रेसला 7 कोटी तर शिवसेनेला 120 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. हां निधी सर्व 227 नगरसेवकाना समान वाटप करावा अशी मागणी विरोधी पक्षातील नगर्सेवाकांची होती. परंतू सत्ताधारी शिवसेना भाजपा आपल्यालाच जास्त निधी घेत असल्याने विरोधी पक्षातील नगर्सेवकानी संताप व्यक्त करत सभागृहात गोंधळ केला. यावेळी नगर्सेव्कानी घोषणा देत स्थायी समितीमधे अधिक्च्या तरतूद केलेल्या पुस्तके फाडून सभागृहात भिर्कावली.
सभागृहात गोंधळ झाल्याने कोंग्रेस्च्या पारुल मेहता, अनिता यादव, अजंता यादव, शीतल म्हात्रे, वकारउन्नीसा, नयना शेठ या 6 नगरसेविकाना एका दिवसासाठी निलंबित करत असल्याची घोषणा महापौर स्नेहल आंबेकर यानी केली. याबाबत बोलताना शिवसेना भाजपा सत्ताधारी मोजक्या काही नेत्यांच्या विभागासाठी निधी लाटत आहे. हां निधी मुंबईकर जनतेचा असून सर्व नगरसेवकाना समान मिळायला हवा. बलोंक एस्टीमेट तयार नसताना या निधिचे वाटप करने चुकीचे असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आम्बेरकर यानी म्हटले आहे. निधिच्या असमान वाट्पाबाबत कोंग्रेस पक्ष न्यायालयात जाईल असा इशारा आम्बेरकर यानी दिला आहे.
