‘निर्भया हेल्पलाईन’ वर ११ दिवसांत चार हजारहून अधिक तक्रारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 March 2015

‘निर्भया हेल्पलाईन’ वर ११ दिवसांत चार हजारहून अधिक तक्रारी

मुंबई- महिलादिनाचे औचित्य साधून रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘निर्भया हेल्पलाईन’ची महिला प्रवाशांना मदत मिळत असल्याचे समोर येत आहे. मुंबईकर महिला प्रवाशांना ९८३३३१२२२२ या क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधता येतो. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचाही पर्याय देण्यात आला आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी महिला प्रवाशांना अडचणीच्या वेळी तक्रार करणे सोयीचे व्हावे, यासाठी ‘व्हाट्सअ‍ॅप नंबर’ सुरू केला होता. ९ मार्च रोजी सुरू झालेल्या या हेल्पलाईन क्रमांकावर केवळ ११ दिवसांत चार हजारहून अधिक तक्रारी आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

या हेल्पलाईनवर देशभरातून जवळपास १२ हजार ४०९ संदेश आले आहेत. मुंबईतून ६२२ महिलांनी या क्रमांकावर तक्रारी नोंद केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राशिवाय बंगाल, कोलकाता, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, हैदराबाद, तमिळनाडू या राज्यांतूनही तक्रारी येत आहेत. हिंसाचार, छेडछाड, छळवणूक, बेपत्ता, समुपदेशन आणि रेल्वेसंदर्भातील तक्रारींचा यात समावेश आहे. ही हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर ११ मार्च रोजी हार्बर रेल्वे मार्गावर झालेल्या बिघाडादरम्यान महिला प्रवाशांकडून या क्रमांकावर ६००हून अधिक तक्रारी आल्या होत्या.

Post Bottom Ad