टोल रस्त्यावरील यूटीलिटीसाठी स्‍वतंत्र युटीलीटी ड्राईव्‍हसाठी धोरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टोल रस्त्यावरील यूटीलिटीसाठी स्‍वतंत्र युटीलीटी ड्राईव्‍हसाठी धोरण

Share This
मुंबइ्र,  दि  10 - राज्‍यातील रस्त्याची  कामे  करताना त्या रस्त्यावरील सेवा  वाहिन्यांसाठी स्‍वतंत्र ड्राईव्‍ह करण्‍याबाबत सरकार  धोरणात्‍मक  निर्णय घेईल काय असा उपप्रश्न  भाजपा  आमदार अॅड आशिष शेलार यांनी  विधानसभेत विचारला होता त्‍याला उत्‍तर देताना मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी  असे  धोरण  तयार  करण्यात  येईल अशी घोषणा केली

कोल्हापूर  मधील  टोल प्रश्नांबाबत   आमदार  राजेश  क्षीरसागर  यांनी  तारांकित  प्रश्न  विचारला  होता  त्यावर हि चर्चा झाली. टोल वसूल करणाऱया कंपनीकडून युटीलीटी शिप्‍ट करण्‍याबाबत दुर्लक्ष करण्‍यात येत असल्‍याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्‍यात आले. यावर उपप्रश्‍न विचारताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी जे रस्‍ते बनविते त्‍यावेळी त्‍या रस्‍त्‍यावरील विविध सेवा वाहिन्‍यांसाठी एक स्‍वतंत्र ड्राईव्‍ह बनविण्‍याबाबत शासन धोरण तयार करणार काय असा प्रश्‍न विचारला होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages