मुंबई मधील नागरिकांनी अवयव दानासाठी पुढाकार घ्यावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2015

मुंबई मधील नागरिकांनी अवयव दानासाठी पुढाकार घ्यावा

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईकर नागरी कांमधे अवयव दानाची संस्कृती रुज्वायाची गरज असून अवयव दानाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने अवयव दानाचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावे असे आवाहन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यानी केले. 


अवयव दान दिनाचे औचित्य साधत आयुक्त सीताराम कुंटे व् अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यानी अवयव दान केले. भारतात 3 दशलक्ष लोकांना आंधळेपणा आहे. रोज 6 हजार लोक मृत्यु पावतात या मृत लोकांचे डोळे दान केल्यास 11 दिवसात आंधळेपणा नाहीसा करता येवू शकतो. 80 टक्के लोकांना त्वचेचा आजार आहे. त्यामध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण मोठे आहे. एक लाख 50 हजार किडनीच्या नविन केसेस दाखल होत असताना फ़क्त 5 हजार किडनी प्रत्यारोपण करता येणे शक्य होत आहे. अश्या सर्व गरजू लोकाना इतर लोकांनी आपले डोळे, किडनी, त्वचा, हृदय, कानाचे पडदे, इत्यादी उपयोगी पडतील असे अवयव दान केल्यास मदत होऊ शकते असे पालिका रुग्णालयाच्या संचालिका सुहासिनी नागदा यानी सांगीतले.


Post Bottom Ad