आजारी मुंबई आणि बेपत्ता आरोग्य समितीच्या अध्यक्षा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आजारी मुंबई आणि बेपत्ता आरोग्य समितीच्या अध्यक्षा

Share This
महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लूचा वेगाने फैलाव सुरुच आहे. स्वाइन फ्लूचे राज्यात ९६ नवे रुग्ण सापडलेत. राज्यात आतापर्यंत २ हजार ३९६ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून स्वाइन फ्लूनं मार्च २०१५ च्या सुरुवातीपर्यंत २०१ बळी घेतले आहेत. राज्यात स्वाइन फ्लू वेगानं पसरतोय. राज्यात स्वाइन फ्लूचे ९६ नवे रुग्ण आढळले असून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या स्वाइन फ्लूचे राज्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २ हजार ३९६ वर गेलीये. आतापर्यंत राज्यात स्वाइन फ्लूनं एकूण २०१ जणांचा बळी घेतलाय तर १०३ रुग्णांवर यशस्वी करण्यात आलेत. १ जानेवारी पासून आजपर्यंत राज्यात २ लाख २७ हजार ८८५ स्वाईन फ्लू सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यात आलीये. त्यापैकी २४ हजार २७० रुग्णांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आलंय.

तसेच मुंबई मध्ये १९ जानेवारी पासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. तेव्हा पासून ७ मार्च पर्यंत स्वाइन फ्लूचे ७५४ रुग्ण आढळले आहेत तर मुंबई बाहेरील ११६ रुग्ण मुंबई मधील पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी मुंबई मधील ७ तर मुंबई बाहेरील १३ अश्या एकूण २० लोकांचा ७ मार्च पर्यंत मृत्यू झाला आहे. ७ मार्च ला ५२ रुग्ण मुंबई मधील विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी ३० ओपीडी मध्ये उपचार घेत आहेत तर २२ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. हि दिवसाची आकडेवारी आहे. या आधीही दर रोज याच प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. 
मुंबई मध्ये स्वाइन फ्लू येण्या आधी डेंग्यू या आजाराने मुंबईकर जनता त्रस्त झाली होती. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुंबईत डेंग्यूचे सुमारे ७०० रुग्ण आढळून आले असून, त्यात २० रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूचे सन २०११ पासून मुंबईत डेंग्यूमुळे तब्बल ४७ रुग्ण दगावले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मुंबई वर सतत आजारांचा हल्ला होत असून मुंबई मधील वातावरणातील बदला मुळे मुंबईकर नागरिक सातत्याने बळी पडत आहे. मुंबई मध्ये विविध आजारांची संख्या हि मोठ्या प्रमाणात आहे. प्रजा फाऊंडेशनच्या च्या आकडेवारी नुसार मुंबई मध्ये टीबीचा आजार जास्त भयानक बनला आहे. मुंबईच्या रुग्णालयात रोज टीबीचे सरासरी ६ रुग्ण दाखल होत असून दररोज ६ जणांचा म्र्त्यू होत आहे. मुंबई मध्ये गेल्या ( २०१४ ) वर्षभरात ७०७५ जणांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण म्हणजे दर रोज २० रुग्णांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे. मुंबई मध्ये एकूण मृत्यू पडणाऱ्यापैकी ३० ते ४० टक्के लोकांचा टीबीमुळे मृत्यू होत आहेत. 
राज्य आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार मुंबई सह राज्यात डिसेंबर २०१४ मध्ये ११ हजार १५५ टीबीच्या रुग्णांची नोंद झाली त्या पैकी ६१५ जणांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे. जानेवारी २०१५ मध्ये १० हजार ४२७ टीबी रुग्णांची नोंद झाली असून ६१० जणांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे. हि सर्व आकडेवारी मुंबई मध्ये किती वेगाने आजार वादाहत आहेत याची परिस्थिती दर्शवत आहेत. मुंबई सातत्याने आजारी असताना स्थानिक स्वराज्य संस्था असलेली मुंबई महानगर पालिकेचे प्रशासन आपल्या परीने आजारांना आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत असले तरी ते प्रयत्न अपुरे पडत आहेत. 
एकीकडे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असताना त्यांना मुंबई महानगर पालिकेमध्ये सत्तेत असलेल्या सत्ताधारयानी प्रशासनाचे मनोबल वाढवण्याचे कामं करणे गरजेचे आहे. डेंग्यू आणि आता स्वाईन फ्लू आजर वाढले असताना मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी रुग्णालयाला काही ठिकाणी भेटी दिल्या. या भेटी दरम्यान केलेल्या वाद्ग्रस्थ विधानामुळे महापौरांचा हे दौरे वादाग्रस्थही ठरले. परंतू मुंबई महानगर पालिकेची आरोग्य समिती आहे. या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना आणि भाजपाने अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांची नियुक्ती केली आहे. त्या अरुण गवळी यांच्या मुलगी आहेत. गीता गवळी यांनी मुंबई आजारी पडलेली असताना कोणत्याही रुग्णालयाला भेट दिल्याचे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे निदर्शनास आलेले नाही. 
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, आरोग्य विभागाच्या संचालिका सुहासिनी नागदा, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी गोमारे इत्यादी अधिकाऱ्यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेवून मुंबई मधील स्वाईन फ्ल्यूची परिस्थिती मिडीया समोर आणली पालिका सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असून मुंबईकर जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन केले होते. हे सर्व प्रयत्न प्रशासन करत असल्याचे दिसत आहे. आरोग्य समितीच्या अध्यक्षा मात्र या मध्ये कुठेही दिसल्या नाहीत. मुंबई मध्ये सातत्याने विविध आजार पसरत असताना आरोग्य समितीच्या अध्यक्षा मात्र फक्त प्रसिद्धी पत्रक काढून आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. यामुळे एकीकडे मुंबईकर नागरिक मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, टीबी अश्या आजारांशी लढत असताना आरोग्य समितीच्या अध्यक्षा मात्र बेपत्ता असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 
आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी या पालिका सभागृहात आरोग्याबाबत एखादा मुद्दा चर्चिला जात असतानाही उपस्थित नसतात. मुंबईला विविध आजारांनी विळखा घातला असताना आरोग्य समितीच्या अध्यक्षांचे दालनही सतत बंद असलेले मुंबईकर नागरिकांना आणि मिडीयाला पाहायला मिळत आहे. सभागृहात आणि मुंबईकर नागरिक आजारांशी मुकाबला करत असताना बेपत्ता असलेल्या गीता गवळी दर आठवड्याला होणाऱ्या (अंडर) स्ट्यान्डिंगच्या बैठकींना मात्र नेहमी उपस्थित असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे आरोग्य समितीच्या अध्यक्षांचे मुंबईकर नागरिकां पेक्षा (अंडर) स्ट्यान्डिंगच्या बैठकींवर जास्त प्रेम हे दिसून येत आहे. 
मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या गीता गवळी यांची मुंबई मध्ये आजार पसरत असताना महत्वाची जबादारी पार पडायला हवी. प्रशासन काय काम करते कोणत्या सुविधा देते त्या सुविधा मुंबईकर नागरिकांपर्यंत खरोखर पोहचतात का याची अध्यक्ष म्हणून खात्री करायला हवी. रुग्णालयात प्रशासनाला न सांगता भेटी द्यायला हव्यात. तरच रुग्णांना खरोखर चांगल्या सुविधा मिळतात का हे समोर येईल. प्रशासन कितीही प्रयत्न करत असेल तरी त्यावर सत्ताधारी आणि संबंधीत समितीच्या अध्यक्षांचा त्यावर अंकुश असावा लागतो. तसा अंकुश असल्याचे सध्या तरी दिसत नाही. मुंबईकर नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी आरोग्य विभागा प्रमाणेच आरोग्य समितीची आणि आरोग्य समिती अध्यक्षांचीही आहे याची नोंद घ्यावी. 
अजेयकुमार जाधव  (मो. ९९६९१९१३६३)


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages