सरकारच्या चहापान कार्यक्रमावर सर्वच विरोधी पक्षांचा बहिष्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सरकारच्या चहापान कार्यक्रमावर सर्वच विरोधी पक्षांचा बहिष्कार

Share This
सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी, विखे-पाटील यांची टिका
मुंबई (प्रतिनिधी): आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला दिलासा नाही, गारपीटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घोषीत केलेली मदत पोहचली नाही, पुरोगामी ज्येष्ठ विचारवंताच्या खुन्यांचा अद्याप थांगपत्ता नाही, दलित-आदिवासी महिलांवरील अत्याचाराला आळा नाही, धनगार, मुस्लिम आणि मराठा आरक्शणाबाबत उदासिनता, मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करणाऱ्या मॅटचा निर्णयाबाबत बेफिकीरी, एलबीटी-टोल रद्द करण्याच्या घोषणेवरून घुमजाव, गोवंशहत्याबंदीचा तसेच स्वाईन फ्ल्यू रोखण्यात सरकारला आलेले अपयश यापार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी भाजपा-सेनेच्या चहापान कर्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यासंबधीची घोषणा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विधान भवनातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. अपयशी सरकारच्या चहापान कार्यक्रमावरील बहिष्कारात काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, सीपीएम, एमआयएम, समाजवादी पक्ष, मनसे, तसेच कपिल पाटील यांचा सहभाग असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.  निवडणूकीत दिलेल्या घोषणांना सरकार स्थापल्यानंतर स्वतःच हरताळ फासणारे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. अवकाळी पाऊस, अवर्षण, गारपीट अशा अस्मानीसं कटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. गेल्या दहा वर्षांत जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसतील तेवढ्या आत्महत्या गेल्या तीन महिन्यात झाल्याची घटना धक्कादायक असून सरकारच्या संवेदना बधीर झाल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला.

धनगर आणि मुस्लिम समाजाची आरक्षणाच्या मुद्यावर मते घेतली मात्र सरकार स्थापल्यांनतर  सरकारने त्यांची फसवणूक केली. सामाजिक प्रश्नांमध्ये धर्मकारण आणि राजकारण आणण्याचा सरकारचा डाव आहे. त्यामुळेच मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत मॅटच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपिल करण्याबाबत चालढकल केली जात आहे. मुस्लिमांचे पाच टक्क्यांचे आरक्शण रद्द करण्याचा जीआर आणि गोवंशहत्याबंदी बाबत केलेल्या घोषणा पाहती समाजिक प्रश्नामंध्ये धार्मिक राजकाणाचा डाव दिसतो, असेही विखे-पटील म्हणाले.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नाही, त्यामुळे माफीयांचा सुळसुळाट झाला आहे. दिवसाढवळ्या शासकिय अधिकाऱ्यांना धमक्या तर पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्या केल्या जात आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात सरकारला अपयश आलेले आहे. धर्म आणि संस्कृती रक्शणाच्या नावाखाली सरकारच्या आशिर्वादाने राज्यात झुंडशाही माजली आहे असा आरोप करून विखे-पाटील म्हणाले की या राज्यात सामाजिक जीवन असुरक्षित झाले आहे, याचा जाब आम्ही सरकारला विधी मंडळाच्या अधिवेशनात विचारणार आहोत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages