मुंबई : जून महिन्यापर्यंत 'क' व 'ड' वर्ग दर्जाच्या सोसायट्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये ज्या सोसायट्यांनी आपल्या याद्या सादर केलेल्या नाहीत व निवडणूक होणे आवश्यक असतानाही काही सोसायट्यांची माहिती शासनाकडे नाही, अशा सोसायट्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली.
आशीष शेलार यांनी राज्यासह मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांबाबतची लक्षवेधी सूचना शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केली होती. या वेळी बोलताना त्यांनी या निवडणुका जून २0१५ च्या आत घेण्यात येणार आहेत. सोसायट्यांची संख्या पाहता त्यासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग या खात्याकडे नसल्यामुळे या निवडणुका वेळेत पूर्ण होणार नाही त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी वर्ग शासन उपलब्ध करून देणार का, तसेच या निवडणुका घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पॅनलवर असणार्या सीएला १५00 रुपयांचे मानधन देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही तरतूद तुटपुंजी असून त्यामध्ये शासन वाढ करणार काय, तर काही सोसायटीमधील सेक्रेटरीने आपल्या सदस्यांची यादी शासनाकडे सादर न केल्यामुळे त्यांची मुदत संपत असतानाही त्यांच्या निवडणुका होणार नाहीत, अशा सोसायट्यांचा पुन्हा सर्व्हे करणार काय, असे प्रश्न आशीष शेलार यांनी या वेळी उपस्थित केले होते.
त्याला उत्तर देताना राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, राज्यात 'क' वर्ग दर्जाच्या ७९३३ व 'ड' वर्ग दर्जाच्या ४५२३ एवढय़ा सोसायट्यांच्या निवडणुका जून २0१५ मध्ये होणार आहेत. तसेच आशीष शेलार यांनी केलेल्या मागणीनुसार सोसायट्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच या कामासाठी जर कर्मचारी वर्ग अपुरा पडला तर इतर खात्याकडून स्टाफ घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सहकार राज्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठकही घेण्याचे मान्य केले. या चर्चेत आमदार अतुल भातखळकर, सरदार तारासिंग, कॅप्टन सेलवन आदी सहभागी झाले.