मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेमधे सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाने पलिकेमध्ये प्रती सभागृह चालवल्याने शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर भाजपाचा विश्वास नसल्याची चर्चा पालिकेत सुरु आहे. दरम्यान गेल्या आठवड्या नंतर सोमवारीही सभागृहात गोंधळ कायम राहिल्याने सभागृह तहकूब करावे लागले आहे.
मुंबई महानगर पालिका सभागृहात गेल्या आठवड्यातील चार दिवस सतत सुरु असलेल्या गोंधळातून सोमवारी पाचव्या दिवशीही मार्ग निघत नसल्याने सत्ताधारी भाजपाने सभात्याग करत प्रती सभागृह चालवले. तर मनसे समाजवादी आणी राष्ट्रवादी पक्षानेही सभात्याग केला. गटनेत्यांच्या बैठकी मध्ये हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. सभागृह चालवले जात नसल्याने बजेट वर चर्चा होत नाही. बजेट 20 मार्च पर्यन्त मंजूर होणे गरजेचे आहे. बजेट वर चर्चा होणे गरजेचे असल्याचे भाजपाचे गट नेते मनोज कोटक यानी सांगितले.
परंतू भाजपाच्या सभात्यागानंतर सभागृहात गोंधळ सुरु असतानाच बजेट वर भाषणे सुरु झाल्याने भाजपाला शिवसेनेवर आणि महापौरंवर विश्वास नसल्यानेच प्रती सभागृह चालवले गेल्याची चर्चा होत आहे. पालिका सभागृहात शुक्रावारी कोंग्रेस नगरसेवकाना धक्काबुक्की करणऱ्या आणि महापौराची खुर्ची हलवून सभागृहाची प्रतिमा मलिन करणाऱ्या शिवसेनेच्या राजू पेड्नेकर, राजेंद्र सूर्यवंशी, अनील सिंग, मिराज शेख, मनीषा पांचाळ या नगरसेवकांना निलंबित करावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यानी केली. परंतू या मागणीकड़े महापौरानी दुर्लक्ष केल्याने सभागृहात सोमवारी पुन्हा गोंधळ घालण्यात आला. सोमवारी सुरु असलेल्या गोंधळात महापौरानी सभागृह चालवण्याचा प्रयत्न केला तरीही गोंधळ सुरु राहिल्याने सभागृह तहकूब करण्यात आले. दरम्यान महापौर आपल्या हट्टावर कायम असून निलंबित नगरसेविकांनी माझ्या दालनात येवून माफी मागावी असे म्हटले आहे. यामुळे मंगळवारीही सभागृहात गोंधळ होणार हे नक्की झाले आहे.