कुलगुरू गजभिये यांना अटक केल्याने राज्यभर आंदोलन करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुलगुरू गजभिये यांना अटक केल्याने राज्यभर आंदोलन करणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - बौद्ध धर्मीय नामदेव गजभिये हे नावाजलेले शास्त्रज्ञ आहेत. गेली ३२ वर्षे कानपूर आयआयटी मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा केली आहे. त्यांनी डॉ. हरिसिंग गौर सेन्ट्रल विद्यापीठाचे मानद कुलगुरू हे पद त्यांनी जबाबदारीने भूषविले आहे. गजभिये यांनी कुलगुरू म्हणून काम करताना विद्यापीठातील १७० रिक्त पदे भरली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारणी यांच्या शिफारशी धुडकावत पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्याना प्राधान्य दिले होते. यामुळे जातीय भावनेतून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत सीबीआय कडून अटक करण्यात आली आहे. हि बाब अपमानास्पद आणि चुकीची असल्याने आंबेडकरी जनतेत याचे तीव्र पडसाद उमटले आहे. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने या प्रकारांची त्वरित दखल घेवून गजभिये यांना न्याय द्यावा अन्यथा १७ मार्चला राज्यभर आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages