पालिका सभागृहात नगरासेवकामध्ये हाणामारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका सभागृहात नगरासेवकामध्ये हाणामारी

Share This
कोंग्रेसचे आणखी 6 नगरसेवक निलंबीत
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेमध्ये गेले ३ दिवस सुरु असलेला गोंधळ शुक्रवारी ४ थ्या दिवशीही सुरु राहिला. निलंबीत नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्याबाबत महापौरानी पलटी मारल्याने काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ केला. गोंधळ सुरु असल्याने आणि सभागृहात शिट्या वाजवल्याने काँग्रेसच्या ललिता यादव, गीता यादव, योगेश भोईर, सागर ठाकुर, शिवा शेट्टी, ब्रायन मिरिन्डा या आणखी ६ नगरसेवकाना निलंबित करण्यात आले. 

गोंधळ सुरु असतानाच मनसेचे संदीप देशपांडे यानी हरकतीच्या मुद्याद्वारे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यानी विकास आराखडा मंजूर न केल्यास येत्या २० वर्षात आरेची धारावी होईल या केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आयुक्तानी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर सर्वच पक्षातील नगरसेवकानी आयुक्तांच्या वक्तव्याचा निषेध करत आयुक्तानी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आयुक्तानी याबाबत सभागृहात येवून निवेदन करावे अशी मागणी करत देशपांडे यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला.

दरम्यान सभाग्रुहात गोंधळ चालूच राहीला. सभागृहात जोरदार सुरु असलेल्या गोंधळामुळे सभागृह १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. याच वेळी शिवसेनेचे राजू पेडणेकर, अनिल सींग, मिराज शेख हे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडे धावून गेले आणि प्रवीण छेड़ा याना धक्काबूककी केली आणि शिवसेना भाजपा आणि कोंग्रेसचे नगरसेवक आपसात भिडले. हा प्रकार सभागृहात १५ - २० मिनिटे सुरूच होता. शेवटी मनसे आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकानी मध्यस्ती करून दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना शांत केले. 

या घडल्या प्रकाराबाबत बोलताना लोकशाहीचा आणि विरोधी पक्षाचा गळा घोटण्याचे काम महापौर करत आहेत. शिवसेनेची हिटलर शाही सुरु असून शिवसेना भाजपाच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे प्रवीण छेड़ा यानी सांगीतले. दर रोज ६ नगरसेवक या प्रमाणे काँग्रेसचे सर्व ५२ नगरसेवक निलंबीत केले तरी आमचे हे आंदोलन चालूच राहील. निलंबीत नगरसेवकांचे निलंबन जो पर्यंत मागे घेत नाही तो पर्यंत आम्ही सभागृह चालू देणार असा  इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी दिला आहे.





Post Bottom Ad

JPN NEWS

Pages