सहकारी गृहनिर्माण संस्थाना जमीन वाटप करण्याबाबतचे सुधारित धोरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सहकारी गृहनिर्माण संस्थाना जमीन वाटप करण्याबाबतचे सुधारित धोरण

Share This
मुंबई दि. १३ – सहकारी गृहनिर्माण संस्थाना जमीन वाटप करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, सदर धोरण निश्चित झाल्या नंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या गोवा मुक्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला जागा देण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली.

स्वातंत्र्य सैनिकांच्या गोवा मुक्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला मुंबईतील मौजे वर्सोव्हा येथील भूखंड क्र. 5 मंजूर करण्यात आला हे खरे आहे काय ? असल्यास सदर भूखंड सी.आर.झेड. मुळे बाधित झाल्याने संस्थेने पर्यायी दुसरी जागा उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केला आहे, हे ही खरे आहे काय ? असल्यास त्याचे वाटप कधी करण्यात येईल असा तारांकित प्रश्न भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात महसूल मंत्री एकनाथ खडे यांनी असे उत्तर दिले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages