राहुल शेवाळे यांचा स्थायी समिती मधील घरवापसीचा रस्ता बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राहुल शेवाळे यांचा स्थायी समिती मधील घरवापसीचा रस्ता बंद

Share This
मुंबई - दक्षिण मध्य मुंबई मधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांना स्थायी समिती अध्यक्ष पदाची स्वप्ने पडत होती. मुंबई महानगर पालिकेतील आर्थीक चाव्या असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शेवाळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले बसले होते परंतू शिवसेनेने त्यांचा पत्ता समिती सदस्यपदावरून कापून टाकल्याने शेवाळे यांचा पालिकेच्या स्थायी समिती मधील घरवापसीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. 
पालिकेच्या स्थायी समिती, सुधार समिती आणि शिक्षण समितीचे प्रत्येकी १३ सदस्य निवृत्त होत आहेत. त्या रिक्त जागेवर काही निवृत्त सदस्यांची पुन्हा वर्णी लावतानाच काहींना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. सभागृहात सोमवारी या तिन्ही समितीमधील निवृत्त सदस्यांच्या जागेवरील नवीन सदस्यांची नावे महापौर स्नेहल आंबेकर यांनी जाहीर केली.
स्थायी समितीत अपक्ष नगरसेवक सिराज शेख यांचाही पत्ता कापून त्याऐवजी अपक्ष नगरसेवक विष्णू गायकवाड यांची निवड केली. तर शेवाळेंच्या जागेवर अंधेरीतील नगरसेवक प्रमोद सावंत आणि अनघा म्हात्रे यांच्या जागेवर हेमांगी वरळीकर यांची निवड केली आहे. मनसेनेही भालचंद्र आंबुरे यांच्या जागा सुधीर जाधव यांना संधी दिली. दिलीप लांडे स्थायीत सदस्य असताना, त्यांची सुधार समिती सदस्य म्हणून निवड केली आहे. त्यामुळे लांडे यांना या पदाचा येत्या राजीनामा द्यावा लागणार असून याठिकाणी मनसे कोणाची वर्णी लावते आहे याकडे सर्वाचे लक्ष आहे. राष्ट्रवादीनेही सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर यांना स्थायी समितीत संधी दिली आहे.
शिक्षण समिती - नवे सदस्य
शिवसेना : मकरंद नार्वेकर,शीतल म्हात्रे, मनाली तुळसकर, अनिल त्रिंबककर, प्राजक्ता सावंत,प्रमोद शिंदे
भाजपा : ज्योती अळवणी, रितू तावडे, शिवनाथ दराडे
काँग्रेस : विनी डिसोझा, फय्याज अहमद.
राष्ट्रवादी काँग्रेस : नंदकुमार वैती.
मनसे : प्रियंका श्रुंगारे
सुधार समिती - नवे सदस्य
शिवसेना : श्रद्धा जाधव, वंदना गवळी, जितेंद्र वळवी
भाजपा : प्रकाश गंगाधरे, मोहन मिठबावकर,
काँग्रेस : मोहसीन हैदर, ज्योत्स्ना मेहता, नोशिर मेहता, अजंता यादव,
मनसे : दिलीप लांडे, संतोष धुरी
राष्ट्रवादी काँग्रेस : हारून खान
सपा : अश्रफ आझमी

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages