मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ३१ मे २0१५ रोजी काढण्यात येणार्या ९८९ घरांसाठी ६ एप्रिल रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र वांद्रे पोटनिवडणुकीची आचारसंहिता आणि घरांच्या किमतींची निश्चिती याबाबत निर्णय न झाल्याने प्रसिद्धीची तारीख पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा सोडतीत गव्हाणपाडा मध्यम उत्पन्न गट १८५ घरे, अत्यल्प उत्पन्न गट १७४, प्रतीक्षानगर मध्यम उत्पन्न गट ५६, उन्नतनगर गोरेगाव अल्प उत्पन्न गट १८२ , अत्यल्प उत्पन्न गट ९४, मानखुर्द अत्यल्प उत्पन्न गट ६६ घरे, मालाड अल्प उत्पन्न गट २३२ घरे सोडतीत उपलब्ध होणार आहेत. मात्र या सोडतीतील घरांच्या किमती अजूनही अंतिम झाल्या नसल्याचे मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी सांगितले आहे. २२ एप्रिल रोजी पार पडणार्या वांद्रे पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने जाहिरात प्रसिद्ध झाल्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी म्हाडाकडून निवडणूक अधिकार्यांकडे परवानगी विचारण्यात आली आहे.मात्र अजूनही निवडणूक कार्यालयातून त्याबाबत हिरवा कंदील मिळाला नसल्याने जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध करावी, याबाबत म्हाडाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. गृहनिर्माण विभागाकडूनही अजूनही अंध, अपंग प्रवर्गाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रस्तावाबाबत सूचना मिळाल्या नसल्याने सोडतीत अंध, अपंग प्रवर्गाच्या ६६ घरे सोडतीत समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. अजूनही सोडतीतील महत्त्वाच्या बाबींमध्ये त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे.