मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून १५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या १0६३ घरांच्या सोडतीतील अर्ज स्वीकृतीला केवळ एका आठवड्याभरात ३३ हजार ६६४ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ७३८३ अर्जदारांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे.
म्हाडाच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला १५ एप्रिल रोजी सुरुवात झाली असून आतापर्यंत ८८ हजार ७६८ अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यापैकी ५३ हजार ८१२ अर्ज सध्या छायाचित्र, पॅन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक नोंदणी प्रक्रियेत सहभागी झाले आहेत, तर १७९४ अर्ज विविध कारणांसाठी नाकारण्यात आले आहेत. तसेच कोकण मंडळासाठी २0६ अर्ज व मुंबई मंडळासाठी ३३४५८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ७३९३ अर्जदारांनी अनामत रक्कम जामा केली आहे. त्यापैकी ४८४२ अर्जदारांनी ऑनलाइन रकमेचा भरणा केला असून २५५१ अर्जदारांनी डीडीने रकमेचा भरणा केला आहे. म्हाडाच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने सोडत पार पडावी, यासाठी अद्ययावत यंत्र प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. म्हाडा सोडतील गेल्या काही वर्षांपासून नोंदणीपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख १८ मे असून २0 मेपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख २0 मे ठरवण्यात आली आहे.