स्वाईन फ्ल्यूने गेल्या पाच वर्षांत ६१ तर २०१५ मध्ये ५0 मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वाईन फ्ल्यूने गेल्या पाच वर्षांत ६१ तर २०१५ मध्ये ५0 मृत्यू

Share This
मुंबई : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे पालिका हद्दीतील स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत माहिती विचारली होती. २0१0 ते २0१४ या चार वर्षांच्या काळात स्वाईन फ्ल्यूचे १ हजार ३0१ रुग्ण आढळून आले. यापैकी ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. वर्ष २0१५ मध्ये १५ मार्चपर्यंत स्वाईन फ्ल्यूचे १ हजार १५0 रुग्ण आढळले. यापैकी ४५0 रुग्णांना दाखल करण्यात आले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षांत स्वाईन फ्ल्यूने मृत्यू पावणार्‍यांची संख्या ६१ आहे. वर्ष २0१0 ते २०१४ पर्यंतच्या मृत्युच्या तुलनेत सन २0१५ च्या पहिल्या तीन महिन्यांत स्वाईन फ्ल्यूने मृत्यू होणार्‍यांची संख्या जास्त आहे. 


मुंबईत गेल्या ४ महिन्यांपासून स्वाईन फ्ल्यूने उच्छाद मांडला आहे. स्वाईन फ्ल्यूचे नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यासाठी पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे स्वतंत्र निधी उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांत स्वाईन फ्ल्यूमुळे ६१ जणांचा बळी गेला आहे. पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे स्वतंत्र निधीची असलेली वाणवा स्वाईन फ्ल्यू वाढवण्याचे मुख्य कारण आहे. स्वाईन फ्ल्यूच्या निदानाची सुविधा सध्या कस्तुरबा रुग्णालय, हाफकीन आणि काही खाजगी प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे. तसेच जनजागृतीसाठी पालिकेने २४११४000 या क्रमांकावर हेल्पलाइनही सुरू केल्याचे गलगली यांना सांगण्यात आले आहे.

स्वाईन फ्ल्यूने मुंबईतील आणखी एक नऊ वर्षांचा बालक दगावला असून या रोगामुळे मुंबईतील व मुंबईबाहेरील दगावल्यांची एकूण संख्या ५0 झाली आहे. यामध्ये मुंबईतील दगावल्यांची एकूण संख्या २0 व मुंबईबाहेरील रुग्णांची संख्या ३0 आहे. या रोगाचे मुंबईत सात व मुंबईबाहेरील दोन रुग्ण आढळले आहेत. सात रुग्णांमध्ये पाच पुरुष व दोन महिला आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages