मुंबई / अजेयकुमार जाधव -
बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी अरविंद दुधवडकर यांची बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. तर सुधार समितीच्या अध्यक्ष पदी प्रकाश गंगाधरे यांची निवड झाली आहे.
बेस्ट समितीची निवडणूक बुधवारी संपन्न झाली. यावेळी शिवसेनेचे अरविंद दुधवडकर याना शिवसेनेची 7 व भाजपाची 2 अशी 9 मते मिळाली. तर काँग्रेसचे सुनील मोरे याना कोंग्रेस आणि राष्ट्रवादिची 5 मते मिळाली. या निवडनुणूकीवेळी मनसेचे 2 सदस्य अनुपस्थित राहिले तर समाजवादी पक्षाने तटस्थ भूमिका घेतली.
सुधार समितीच्या निवडणूकीमध्ये भाजपाच्या प्रकाश गंगाधरे याना शिवसेनेची 9, भाजपाची 4 व अखील भारतीय सेनेचे 1 अशी 14 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या अजंता यादव याना काँग्रेसची 6 राष्ट्रवादीची 2 अशी 6 मते मिळाली. या निवडनुकीमध्येही मनसे अनुपस्थित तर समाजवादी पक्षाने तटस्थ भूमिका घेतली.
