राष्ट्रगीताचा अवमान - चुकी कर्मचाऱ्याची तक्रार मात्र महापौरांविरोधात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राष्ट्रगीताचा अवमान - चुकी कर्मचाऱ्याची तक्रार मात्र महापौरांविरोधात

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात लोकशाहीर साबळे यांना श्रद्धांजली वाहताना साऊंड स्टिस्टीम हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याकडून चुकीच्या वेळी सुरु करण्यात आलेले राष्ट्रगीत महापौरांनी अर्ध्यावर थांबवले आणि पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू केले. त्यामुळे महापौरांनी राष्ट्रगीताचा अवमान केला असल्याचा आरोप करत महापौरांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर व शितल म्हात्रे यांनी मंगळवारी रात्री उशीरा तक्रार दाखल केली आहे. 

मंगळवारी पालिका सभागृहात लोकशाहीर साबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. श्रद्धांजली वाहण्यासाठी नगरसेवकांची भाषणे झाल्यावर दोन मिनिटे उभे राहून मूक श्रद्धांजली वाहण्यात येत होती. सर्व नगरसेवक श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे असल्याने सभागृहातील नवख्या असलेल्या कर्मचाऱ्याने सभागृह संपले असे समजून राष्ट्रगीताची ध्वनिफीत सुरु केली. मूक श्रद्धांजली वाहत असताना व सभागृहाचे कामकाज बाकी असताना राष्ट्रगित सुरु केल्याने ते पालिका सभागृहातील कर्मचारी आणि महापौरांनी थांबवले. नवख्या पालिका कर्मचाऱ्याकडून चुकून वाजवण्यात आलेले राष्ट्रगीत पालिका कर्मचारी आणि महापौर यांच्याकडून थांबवण्यात आले असताना एकट्या महापौरां विरोधात राष्ट्रगीताचा अवमान केल्याची तक्रार विरोधी पक्षांनी पोलीस ठाण्यात केली आहे. 

दरम्यान याबाबत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्याशी संपर्क साधला असता विरोधीपक्ष नेत्यांचा आरोप निरागस आणि खोटा असल्याचे सांगितले. सभागृहात लोकशाहीर साबळे यांना श्रध्दांजली वाहण्यात येत होती. त्याचवेळी सभागृहातील साऊंड स्टिस्टीम हाताळणाऱ्या नवख्या व्यक्तीने सभागृहाचे कामकाज संपल्याचे समजून राष्ट्रगीत सुरू केले. मात्र, सभागृहाचे कामकाज बाकी असल्याने राष्ट्रगीत थांबविण्यात आले. त्यानंतर शिल्लक कामकाज पार पाडले. त्यामुळे यात महापौरांची काहीच चुक नसून विरोधक उगाचच राजकारण करीत असल्याचे तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापौरांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठविल्याचे विश्वासराव यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages