गौतम नगरमधील सफाई कर्मचारी 10 वर्षे सेवा निवासस्थानाच्या प्रतिक्षेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गौतम नगरमधील सफाई कर्मचारी 10 वर्षे सेवा निवासस्थानाच्या प्रतिक्षेत

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा निवासस्थान असलेल्या इमारती पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी मुंबई महानगर पालिका करोडो रुपयांचा निधी मंजूर करत असली तरी हा निधी खर्चच केला जात नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १० वर्षात आपली सेवा निवासस्थान असलेल्या इमारती बांधून मिळाल्या नाहीत. 

मुंबई महानगरपालिकेने दादर येथील गौतम नगर येथे असलेली सफाई कर्मचाऱ्यांची इमारत क्रमांक ४ व ५ ची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी भारत कन्स्ट्रक्शन या कंपनीला २ कोटी ३५ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समिती समोर आला आहे. पालिकेच्या मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरस्ती करावी अन्यथा अश्या इमारती कोसळू शकतात म्हणून या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. एकीकडे गौतम नगर मधील ४ व ५ हि इमारत दुरुस्त केली जात असताना इमारत क्रमांक १२ मधील कर्मचाऱ्यांना गेल्या १० वर्षात आपली इमारत बांधून मिळालेली नाही. 

इमारत क्रमांक 12 मधील रहिवाश्यांकडून इमारत बांधली नसतानाही गेले 10 वर्षे दरमहिन्याला 3 ते 4 हजार रुपये घरभाड़े कापून घेतले जात आहे. या इमारती मधील 20 कर्मचार्यांचे कुटुंबीय सायन, धारावी,अन्टोपहील, नायगाव पालिका शाळा येथे गेली 10 वर्षे राहत आहेत. याबाबत येथील रहिवाश्यानी तत्कालीन महापौर सुनील प्रभु व आयुक्त सीताराम कुंटे याना 7 मार्च 2013 ला पत्र दिले होते. परंतू अद्याप दुर्लक्ष केले जात असल्याने इमारत क्रमांक 12 मधील रहिवाश्यांना गेल्या 10 वर्षात सेवानिवासस्थान मिळालेले नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages