सिद्धार्थ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सिद्धार्थ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

Share This
शासनाने, विद्यापीठाने दखल घेण्याची मागणी
मुंबई / अजेयकुमार जाधव 
सिद्धार्थ महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य म्हस्के यांना बंदुकीचा धाक दाखवून निलंबनाच्या पत्रावर सही घेण्यात आली. तसेच त्यांच्या कार्यालयात घुसून महत्वाची कागदपत्रे चोरी करण्यात आली आहे. याची तक्रार करूनही आझाद मैदान आणि मीरा रोड येथील पोलिस कोणतीही कारवाई करत नसल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेवुन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, कुलगुरु यांनी न्याय द्यावा अशी मागणी म्हस्के यानी केली आहे. शासनाने गंभीर दखल न घेतल्यास महाविद्यालयातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटूबियांचा जिव धोक्यात येवू शकतो असे म्हस्के यानी सांगीतले. 

सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हस्के यांच्या घरी घरी जाऊन रिपाई आठवले गटाच्या कर्यकर्त्यानी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करुत त्यांच्याकडून निलंबन पत्रावर जबरदस्ती सही घेण्यात आली तसेच महाविद्यालयातील कार्यालयात घुसून कागदपत्रे चोरी करण्यात आली याबाबत पोलिसांत तक्रार केल्यावर एफआयआर न घेता साधी एनसी घेण्यात आली. तसेच माझ्याच विरोधात खोटी तक्रार करण्यात आली यामुले पोलिसांकडून आणि सरकारकडून आठवले गटाच्या गुंड प्रवृत्तीच्या कर्यकर्त्याना पाठीशी घातले जात आहे असा आरोप प्रभारी प्राचार्य यु. एम्. म्हस्के यानी पत्रकार परिषदेत केला. 

१५ एप्रिलला मीरा रोड येथे आठवले गटाच्या महेश खरे, देवेन्द्र शेलेकर, श्रीकांत मोरे, विशाल गायकवाड, बाला चन्द्रमोरे इत्यादी कर्यकर्त्यानी कृष्णा पाटिल, अशोक तलवटकर, डी. जे. गांगुर्डे यांच्या सांगान्यानुसार माझ्यावर हल्ला केला. विद्यापीठाने मला दैनदिन कामासाठी नेमले असतानाही मला माझे काम करण्यापासून रोखले जात असल्याचे म्हस्के यानी सांगीतले. माझ्याकडून सोसायटीने सह्या घ्यायला हव्यात असे असताना गुंड येवून सह्या घेत आहेत. माझ्याकडून सही घेतल्यावर मला अशोक तलवटकर यांनी फोन करुन ३१ में पर्यंत महाविद्यालयात येवू नका असे सांगीतल्याचे म्हस्के यानी सांगीतले. सरकारमधे आठवले गटाचा सहभाग असल्याने आमच्यावर अन्याय केला जात असून आमच्या व् कुटुंबियांचा जीव धोक्यात आल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages