बीपीसीएल मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू - कंत्राटदार होणार ब्लॅक लिस्टेड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बीपीसीएल मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू - कंत्राटदार होणार ब्लॅक लिस्टेड

Share This
मुंबई / 22 एप्रिल 2015 / रशिद इनामदारबिपीसीएल मध्ये भ्रष्टाचाराचा कळस या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. अशाच आशयाच्या बातम्या इतर वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या होत्या .भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड ची माहुल येथे असलेल्या रिफायणरीमधील भ्रष्ट कारभाराबद्दल  गौप्यस्फोट यातुन करण्यात आला होता .बीपीसिएल व्यवस्थापनातील कर्मचारी  ,सिआयएसएफ आणि खाजगी ठेकेदारांचं पितळ उघडं पडलं .त्यानंतर बिपीसिएल प्रशासनाला जाग आली .प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे .


आय एस एफ ,बिपीसिएल आणि ठेकेदार संगनमताने सुरक्शेचे नियम धाब्यावर बसवत होते .पोलिस चारित्र्य पडताळनी शिवाय रिफायनरीमध्ये मजुरांना प्रवेश मिळत होते .काही मजूरांना बहुतेकदा खोट्या कागदपत्रांवर प्रवेश दिला जात होता. त्यामध्ये बहुतांशी मजुर हे परप्रांतीय आहे. बहुतेक गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले आहेत .त्यामुळे अतीसंवेदनशील रिफायनरी परीसरात  घातपात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .ओफशोअर इंनफ्रास्ट्रक्चर ही कंत्राटदार कंपनीअसा गैरप्रकार मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे सध्या चौकशीच्या रडारवर आहे.या कंपनीने मोठा नफा कमवण्याच्या नादात हा गैरप्रकार केला असल्याचे बोलले जात आहे . मजुरांची कुठेही, कसल्याही प्रकारची नोंद होणार नाही याची खबरदारी घेत नाममात्र रोजंदारी दिली जात आहे.ही  बाब निदर्शनास आल्यानंतर या कंपनीची चौकशी सुरू झाली आहे .कंपनीने आजवर केलेल्या कामाची गुणवत्ता त्याबदल्यात दिले गेलेला निधि या बाबींची सखोल चौकशी होणार आहे. कंपनीचे मालक शैलेश सचदेवा यांनी यासंदर्भात जावेद शेख व गौस या दोन मॅनेजरची कान उघडणी करण्याचा देखावा मात्र केला आहे पण प्रत्यक्षात मजुरांचे वेतन ,भविष्य निर्वाह निधि या विषयांना बगल दिली आहे 

केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना वरीष्ठांकडुन ताकीद मिळाल्यामुळे सर्व मजुरांची कसुन तपासणी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही .रवीवारी अशीच तपासणी सुरू असताना मजुर व जवानांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. मजुरांनी दगडफेक केल्यामुळे सुरक्षा रक्शक चौकीच्या काचा फुटल्या जवान व मजुर जख्मी झाले आहेत .यानंतर 28 जणांना आर् सि एफ पोलिसांनी अटक केली आहे. काही जण फरार आहेत .23 एप्रिल पर्यंत त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे .सि सि टि व्ही फुटेज च्या आधारावर चौकशी सुरू आहे विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मजुराचे नाव यादीत येवू यासाठी चौकशी अधिकार्यांना मॅनेज करण्यासाठी कंत्राटदार प्रयत्नशील आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages