विकास आराखडया विरोधात 20 एप्रिलला आझाद मैदानात धरणे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विकास आराखडया विरोधात 20 एप्रिलला आझाद मैदानात धरणे आंदोलन

Share This
मुंबई / प्रतिनिधी - पालिकेच्या प्रस्तावीत विकास आराखडयामुळे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाची कामे तसेच जुन्या मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त चाळींचा, म्हाडा इमारतींचा आणि जुन्या खाजगी गृहनिर्माण संस्थाच्या पुनर्विकासाची कामे ठप्प होणार आहे तसेच मुंबई तील कोळीवाडे, गावठाणे, पाडे  गायब होणार असल्याने अॅफाॅटेबल हाऊसिंग वेल्फेअर आॅगॅनायझेशन आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोशिएशन तफै 20 एप्रिलला सकाळी 10 वाजता आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष रमेश पभू तसेच प्रवक्ता सुनिल शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 


सर्व सामान्य मुंबईकरांना निवा-यासाठी मुंबईबाहेर जावे लागणार आहे अशी भीती निर्माण झाली असल्याने हा प्र-तावित विकास आराखडा रद्द करून सव॔ सामन्य मुंबई कराना नजरेसमोर ठेवून नवीन विकास आराखडा तयार करावा या मागणीसाठी अॅफाॅटेबल हाऊसिंग वेल्फेअर आॅगॅनायझेशन आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोशिएशन तफै धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष रमेश पभू तसेच प्रवक्ता सुनिल शर्मा यांनी सांगितले. चुकीच्या विकास आराखडया विरोधात आमच्या संघटनेने मुंबईतील अनेक भागात जनजागृतीचे  कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती रमेश पभू यांनी यावेळी दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages