मुंबईच्या विकास आराखड्यात अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होणार नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईच्या विकास आराखड्यात अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होणार नाही

Share This
मुंबई दि. १६,  मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखडा महापालिकेची उद्दीष्ट पूर्ण न करणारा तसेच प्रक्रियेत अनियमीतता असलेला आणि विविध सामाज घटकांवर अन्याय करणारा आहे. मुंख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी म्हणूनच त्याचा अभ्यास करण्यासाठी चौकशी समिती गठीत केली असून यासमितीचा अहवालही लवकरच येईल असे अपेक्षीत आहे.  समितीचा अहवाल काहीही आला तरी कोणत्याही परिस्थितीत सर्व समाजघटकांसह अल्पसंख्यांक समाजावर अन्याय करणारा  विकास आराखडा आम्ही मान्य करणार नाही. अशी ग्वाही मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी आज दिली.


अल्पसंख्यांक समाजातील विविध संस्थांतर्फे आज ग्रँड रोड येथील जमाई कादरीया अशरफिया मदरसा येथे मुंबईच्या प्रस्थावीत विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला प्रमूख वक्ते म्हणून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांना आमंत्रीत करण्यात आले होते. तसेच या बैठकीला मौलाना मोईनुद्दीन अज्रफ, डॉ. जहीर काजी, मौलाना सईद नूरी, सोहेल खंडवानी,  हैदर आजम, शमीम हवा, सच्चर  जलीम ही सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संस्थामध्ये काम करणाऱ्यांनाही आमंत्रीत करण्यात आले होते. तसेच मुंबईतील सुमारे १०० मज्सीदींचे इमाम यावेळी उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्यांक समाजातर्फे बोललेल्या वक्त्यांनी या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली. या विकास आराखड्यामध्ये अधिकृत मज्जीद, मंदीर, दरगा, चर्चा आणि इतर धार्मिक स्थळे यांचे काय होणार याबाबत संभ्रम असून अल्पसंख्यांक समाजामध्ये या विकास आराखड्याबाबत नाराजीसह भितीचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

तोच धागा पकडून बोलताना आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मी कुठल्याही जाती धर्माचा चष्मा लावून या विकास आराखड्याकडे पाहत नाही. मी एक वकिल एक नागरिक या नात्यानेच विकास आराखड्याकडे पाहतो आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेने  सर्वसमाजघटकांना दिलेले अधिकार अबाधित ठेवून हा विकास आराखडा झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे.  त्यामुळेच याबाबात मी स्पष्ट भूमिका घेऊन विधानसभेत ती मांडली . या आराखड्याची चौकशी करण्याची मागणी केली आणि ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. राज्याचे मूख्य सचिव क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली गठीत  झालेल्या या समितीने अधिवेशन संपण्याच्या आत अवघ्या तीन दिवसात आपला प्राथमिक अहवाल दिला,  त्या अहवालात या समितीने विकास आराखड्यात काही गडबडी असल्याचा प्राथमिक अंदाजही व्यक्त केला आहे. या समितीचा पूर्ण अहवाल लवकरच येणे अपेक्षित आहे. तो आल्यानंतर यातील सत्य समोर येईल. पण हा विकास आराखडा ज्या सध्याच्या जागावापराच्या सर्वेवर(ईएलयू)  आधारीत आहे.  त्या सर्वेक्षणामध्येच प्रचंड गोंधळ आहे ज्या जागेवर मंदिर, चर्च, मस्जीद,. कोळीवाडे आहेत ते या सर्वेमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच जनतेमध्ये याबाबतची संभ्रमता अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रीयाच संशयाच्या भोवऱ्यात आहे . आता या समितीचा आहवाल आल्यानंतर याबाबतचे सत्य समोर येईल हे काम २००९ साली महापालिकेने सुरू केले एमआरटीपीच्या कायद्यानुसार ही प्रक्रीया करण्यात येत आहे या शहराचा पूढील २० वर्षांचा हा प्लान तयार होतो आहे. या शहराची प्राप्त परिस्थिती पाहता हे अत्यंत गुंतागुंतीचे काम आहे.  हे जरी सत्य असले तरी हा विकास आराखडा  मानवी चेहरा असलेला असायला हवा सर्व समाजघटकांना सामावून घेऊन राज्यघटनेने सर्वांना दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणारा असावा हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे भाजपाचा मुंबई अध्यक्ष या नात्याने कुठल्याही समाज घटकावर अन्याय करणारा विकास आराखडा आम्ही मान्य करणार नाही अशी ग्वाही आमदार ऍड. आशिष शेलार यांनी दिली.

Displaying IMG-20150416-WA0059.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages