मुंबई / प्रतिनिधी - राज्यातील सरकारने लागू केलेला गोवंश हत्याबंदी कायदा अत्यंत अन्यायकारक आहे, या कायद्यामुळे हजारो जणांचे कुटुंबिय बेरोजगार झाले आहेत. गोहत्या बंदी कायदा असताना हा कायदा करण्याची गरज नव्हती.हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी कुरैशी समाजासोबत रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज दिला. या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी घोषित केले.
मदनपुरा येथील चौकात या कायद्याविरोधात सेक्युलर फ्रंट महाराष्ट्र या संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.आठवले पुढे म्हणाले, मुस्लिम समाज हा देशातील मुळ नागरिक असून हा समाज बाहेरुन आलेला नाही. धर्माच्या आधारावर समाजामध्ये दुही पसरवणे अत्यंत चुकीचे आहे. हे विधेयक स्वाक्षरी करण्यापू्र्वी राष्ट्रपतींनी मागे पाठवण्याची गरज होती असे मत त्यांनी व्यक्त केले. या मुद्द्यावर शक्ती दाखवण्यासाठी बकऱ्यांच्या मटणाचा व्यापार करणाऱ्यांनी आठवडाभर बाजार बंद ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगात केवळ भारतातच हा कायदा असल्याचे ते म्हणाले. हा कायदा रद्द व्हावा ही सर्वांची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, सरकारने याबाबत विचार करावा असे आवाहन केले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे आमदार आरिफ नसीम खान, अमीन पटेल,माजी आमदार नवाब मलिक, समाजवादी पक्षाचे महापालिकेतील गटनेते रईस शेख, जावेद जुनैजा, जमैतुल कुरैशचे अध्यक्ष खालीद कुरैशी, इम्रान कुरैशी, मोबीन कुरैशी, गौतम सोनावणे, तानसेन ननावरे उपस्थित होते.