मुंबई। अजेयकुमार जाधव
सन 2014 मधे मुंबई महानगर पालिकेकडे आलेल्या 66 हजार747 नागरी समस्यांपैकी फ़क्त 35 टक्के समस्या सोडवता आल्या आहेत. तर63 टक्के समस्यांवर अद्याप उत्तर शोधता आलेले नाही. दूषित पाणी, ड्रेनेज चोकअप कचरा उचलणे अश्या समस्या 3 दिवसात सोडवायला हव्यात असे असताना पालिकेला या समस्या सोडवण्यासाठी पलिकेला 17 दिवस लागले अशी माहिती प्रजा फौंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली. प्रेस क्लब, मुंबई येथे प्रजा फौंडेशनच्या वतीने पालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना म्हस्के बोलत होते.
पालिकेला अश्या समस्या सोडवता आल्या नसल्याने मुंबईकर नागरिकांच्या आरोग्या करिता धोकादायक आहे. अश्या कामामुळे आपल्याला जागतीक दर्जाचे शहर कसे मिळेल असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या रस्त्यावरील तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 2013 च्या तुलनेत 2014 मधे 48.3 टक्क्यानी कमी झाले आहे. 2014मधे ड्रेनेज संबंधी 26.1टक्के घट दिसून आली आहे. पाणीपुरवठ्या संबंधी समस्या 25.8 टकक्यानी वाढल्या असून घन कचरा व्यवस्थापनच्या समस्या 32.8 आणि पर्जन्य जल वाहिन्या बाबतच्या समस्या 29.6 टक्क्यानी वाढल्याची माहिती म्हस्के यांनी दिली.
नागरी समस्या सोडव्ण्यासाठी नगरसेवक तेवढे सक्रीय नाहीत. 227 नगरसेवकानी 2014मधे वार्ड कमिटिच्या बैठकीत 970 प्रश्न विचारले. त्यापैकी 11टक्के म्हणजे 109प्रश्न रस्ते आणि चौकांचे नव्याने नामकरण करण्याबाबतचे होते. 27 नगरसेवकांनी 2014मधे एकही प्रश्न विचारलेला नाही. पालिकेने नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेबसाईट बनवली आहे. पालिकेने या वेबसाईटचा समस्या सोडवण्यासाठी चांगला वापर करायला हवा असे निताई मेहता म्हणाले.

