बंदला पाठिंबा देणार्या कर्मचार्यांवर कारवाई
मुंबई : गुरुवारी ( ३० एप्रिल ) वाहतूकदारांचा देशव्यापी बंद असला तरी, मुंबईतील दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टची बससेवा सुरूच राहणार आहे. बेस्ट उपक्रम एकही बस बंद ठेवणार नसल्यामुळे मुंबईकरांनी निश्चिंत राहावे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
सध्याच्या मोटार वाहन कायद्यात पार्लमेंटने बदल प्रस्तावित केला असून, त्याला देशातील वाहतूकदारांचा विरोध आहे. या नव्या कायद्याच्या विरोधात देशातील 'एनएफटीडब्ल्यू' या संघटनेच्या झेंड्याखाली महाराष्ट्रासह अन्य राज्यातील वाहतूकदारांच्या संघटनांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. त्याला शिवसेना प्रणीत वाहतूकदारांच्या संघटनेने पाठिंबा दिलेला नाही, पण बेस्ट उपक्रमातील काही संघटनांसह अन्य संघटना पाठिंबा देणार आहेत.
या बंदसंदर्भात महाव्यवस्थापक म्हणाले, 'बेस्ट मुंबईची जीवनवाहिनी असून, ती बंद ठेवणे अयोग्य आहे. यामुळे बेस्टची बससेवा चालू ठेवण्यासाठी उपक्रमाने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून बेस्टचे आगार व बस स्थानके आणि बेस्टच्या बसगाड्यांना पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली आहे. याआधीही पोलिसांनी बेस्ट उपक्रमाला सहकार्य केले असल्याने या वेळेसही सहकार्य निश्चितच मिळेल. बेस्टच्या बस सुरू राहण्यासाठी सर्व कर्मचार्यांनी या दिवशी कामावर उपस्थित राहण्याच्या आधीच सूचना देण्यात आल्या असून, गुरुवारी जाणूनबुजून गैरहजर राहणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान गुरुवारी होणार्या 'बंद'ला शिवसेनेचा पाठिंबा नसून, बेस्टच्या बसगाड्या सुरू राहतील, असे बेस्ट समितीमधील शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. 'संपकर्त्या संघटनांचे निमंत्रक अँड़ उदय आंबोणकर यांनी हिंमत असेल तर गुरुवारी बसगाड्या बंद करून दाखवाव्यातच, असे आवाहन सामंत यांनी दिले.