मुंबई - मलबारहील, मरिन ड्राईव्ह, हॅंगिंग गार्डन, भुलाभाई देसाई मार्ग पेडर रोड, नेपीयन्सी रोड या व्हीआयपी मार्गाच्यां 24 तास साफ-सफाईवरुन आज महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासानाची चांगलीच झाडा झडती घेतली.सदस्यांनी कान पिळल्यानंतर प्रशासानाने संपुर्ण मुंबई शहरात अशाच पध्दतीने स्वच्छता करण्या बाबात विचार करण्याचे आश्वासन दिले.
राज्यपाल,मुख्यमंत्री,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती,पालिका आयुक्त विदेशी वकीलात यांच्यासह अनेक महत्वांच्या व्यक्तींची निवासस्थाने तसेच सात महत्वाची पर्यटन स्थळे आहेत.त्यामुळे या भागातील 18 महत्वाच्या रस्त्यांची 24 तास स्वच्छता पुरविण्यासाठी महानगर पालिकेने अतिरीक्त कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येते.या कामागारांचे कंत्राट जानेवारी महिन्यात संपल्यानंतर पालिकेने निवीदा न मागवता त्याच संस्थांना मार्च अखेर पर्यंत कायम ठेवले.या तीन महिन्यांचे पैसे देण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता.
या कामासाठी पालिकेने 34 लाख रुपये खर्च केले आहेत.यावर कॉंग्रेसचे आसिफ झकेरीया यांनी आक्षेप घेतला.निवीदा न मागवता हे काम कसे करण्यात आले.मुंबईत इतर ठिकाणी अशी सुविधा नाही.मग,याच रस्त्यावर अशी सुविधा का हा असे प्रश्न त्यांनी उपस्थीत केले.तर,उपनगरातही पर्यटन स्थळे आहेत.मात्र,त्यांच्या स्वच्छतेसाठी प्रशासन अशी योजना आखत नाहीत. असा आक्षेप भाजपचे दिलीप पटेल यांनी नोंदवला.
याच रस्त्यांच्या धर्तीवर संपुर्ण मुंबईत स्वच्छता ठेवण्या बाबात विचार करण्याचे आश्वासन अतिरीक्त आयुक्त डॉ.पल्लवी दराडे यांनी दिली.या भागांमध्ये तीन पाळ्यांमध्ये स्वच्छता केली जाते.रात्रीच्या वेळीही रस्ते साफ केले जातात.इतर भागात मात्र फक्त सकाळच्या वेळी रस्ते झाडले जातात.