सीएसटी स्थानकात वायफायसाठी २५ स्पॉटची निवड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सीएसटी स्थानकात वायफायसाठी २५ स्पॉटची निवड

Share This
मुंबई : सीएसटी स्थानकात लवकरच वायफाय सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने या स्थानकात सुमारे २५ ठिकाणांची निवड झाली आहे, मात्र या 'स्पॉट'वर वायफाय सुरू करण्यासाठी परवानग्या आदी सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहेत. त्यानंतर या स्थानकात 'वायफाय' सुरू होणार आहे. 

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत 'रेल नेट' या महामंडळातर्फे 'वायफाय' बसवले जाणार असून, सीएसटीलाही हेच महामंडळ वायफाय यंत्रणा सुरूकरणार आहे. पण ही यंत्रणा सुरू करण्यासाठी मुख्य मुद्दा सुरक्षेचा असून, त्याची परवानगी घेणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिवाय वायफाय देताना ही सेवा किती मिनिटे मोफत द्यावी, ही सेवा सुरू करण्यासाठी एकाच वेळी दिला जाणारा 'पासवर्ड' कशा पद्धतीने द्यावा, याचाही सखोल विचार केला जाणार आहे. ही सेवा विनामूल्य असल्याने ती घेण्यासाठी स्थानकात येणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी वाढता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages