50 विकलांगांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक अवयव प्रदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

50 विकलांगांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक अवयव प्रदान

Share This

Displaying DSC_0196.jpg

ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांच्या प्रयत्नाने आज सामान्य लोकांना केंद्र सरकारच्या कॉकलेअर एमप्लाण्ट उपचाराची माहिती मिळाली, तसेच या उपचार पध्दती केल्यामुळे ( 0 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ऐकू शकणार आहे) हे आजच्या कार्यक्रमाचे मोठे फलित म्हणावे लागेल. तसेच आलिया वर्जन संस्थेसाठी जागा मिळवून देण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता प्रयत्न करणार आहेत.या कार्यक्रमाअंतर्गत एकूण 50 विकलांग लोकांना आधुनिक कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले. गतिमंद अशा एकूण 43 बालकांना एज्युकेशऩल किटस् आणि 54 लोकांना कानाच्या मशीन्सचे वाटप करण्यात आले.


विकलांग व्यक्तींच्या आधुनिक उपचार आणि तपासणीसाठी आज विकलांग सहाय्यता अभियानाचे आज भाडूंप पश्चिमस सह्याद्री हायस्कूलमध्ये आयोजन कऱण्यात आले होते. या अभियानानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री. थावरचंद गेहलोट, राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, अलिया वर्जन संस्थेचे डायरेक्टर ए.के.सिन्हा, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव अवस्थी आणि ईशान्य मुंबईचे खासदार डॉ.किरीट सोमैया उपस्थित होते. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या अभियानांतर्गत 468 विकलांग लोकांनी विविध उपचारांसाठी रजिस्ट्रेशन केले.

कार्यक्रमाचे विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अंतर्गत कोकलिअर एमप्लाण्ट सर्जरी ( जन्मत: मूकबधिर असणा-या 10 वर्षाखालील मुलांवर उपचार) सुरुवात झाली. या  34 मुलांचे रजिस्ट्रेशन झाले असून त्यांच्यावर कर्णावत प्रत्यारोपणामुळे ते ऐकू शकणार आहेत. मूळातच कोकलिअर प्रत्यारोपण ही आधुनिक उपचार पध्दती असून त्यासाठी एका बालकासाठी 6 लाख रुपये खर्च येतो. त्याबाबतचे संमतीपत्र आज 34 गरजूंना देण्यात आले. यासाठी येणारा 1 कोटी 26 लाखाचा खर्च केंद्र सरकार कऱणार आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages