पालिकेच्या वैधानिक समितीच्या अध्यक्ष पदासाठी नामांकने दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या वैधानिक समितीच्या अध्यक्ष पदासाठी नामांकने दाखल

Share This
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या वैधानिक समितीच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी शेवटच्या दिवशी सर्व पक्षीय इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. शनिवारी ग्रहण असल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांनी धावपळ करत दुपारी ग्रहण लागण्या आधीच अर्ज भरल्याने पालिका मुख्यालयात चर्चेचा विषय ठरला आहे.


पालिकेच्या आर्थिक चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी पुन्हा शिवसेनेकडून यशोधर फणसे याना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कोंग्रेसच्या वकारउन्निसा अंसारी यानी आपला अर्ज भरला आहे. पालिकेचे 2500 कोटी रुपयांचे बजट असलेल्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या रीतू तावडे यानी तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या वीनी डिसोझा यानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बेस्ट समितीच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने अरविंद दुधवडकर याना उमेदवारी दिली असून दूधवडकर यानी आपला अर्ज दाखल केला आहे. दुधवडकर यांच्या विरोधात काँग्रेसच्या सुनील मोरे यानी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुधार समितीच्या अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या प्रकाश गंगाधरे यानी तर त्यांच्या विरोधात कोंग्रेसच्या अजंता यादव यानी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages