मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडचे व्यवस्थापन पालिकेने हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. डम्पिंग ग्राऊंडचे व्यवस्थापन पाहणार्या खाजगी कंत्राटदाराने देखभाल आणि इतर खर्च वाढवण्याची मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
मुंबईमधील गोराई येथील डम्पिंग ग्राऊंड बंद होऊन कित्तेक वर्षे झाली आहेत, तर कांजूर मार्ग येथील डम्पिंग ग्राऊंड वादात सापडले आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास मंजुरी मिळाली आहे, मात्र मुंबईत प्रत्येक दिवशी निर्माण होणार्या कचर्याचे प्रमाण लक्षात घेता कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंड पुरेसे नसल्याने फक्त देवनार डम्पिंग ग्राऊंडचा पर्याय पालिकेकडे आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडची कचरा साठवण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. युनायटेड फॉस्फरस लि. या कंपनीस ९ वर्षांपूर्वी पालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडचे व्यवस्थापन, कचर्याची विल्हेवाट आणि इतर कारणांसाठी कंत्राट दिले होते. कंपनीने प्रत्येक टनामागे मिळणारे शुल्क वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पालिकेने काही अंशी कंत्राटदारास शुल्क वाढूवन दिले होते, मात्र यावरून मोठय़ा प्रमाणावर गदारोळ निर्माण झाला होता. राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालून शुल्क वाढवणे बेकायदा ठरवले. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून अखेर पालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडचे व्यवस्थापन हाती घेतले आहे.