डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 8 ते 14 एप्रील "सामाजिक समता सप्ताह" - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 8 ते 14 एप्रील "सामाजिक समता सप्ताह"

Share This
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह 8 ते 14 एप्रिल 2015 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. 

या सप्ताहाचे नियोजन पुढीलप्रमाणे :- 8 एप्रिल 2015 रोजी समता सप्ताहाचे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन, दि.9 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व महामंडळांमार्फत विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप, 10 एप्रिल रोजी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, दृकश्राव्य, प्रिंट मीडिया यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा, 11 एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी व सिव्हील सर्जन यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन व व्यसनमुक्ती प्रसार कामात कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  
        
12 एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे, 13 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सामाजिक कार्य क्षेत्रातील विचारवंत, नामवंत पत्रकार यांचे विविध विषयावरील समाज प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा सांगता समारंभ होणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages