महापौरांच्या राजिनाम्याने पालिका सभागृहात गोंधळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौरांच्या राजिनाम्याने पालिका सभागृहात गोंधळ

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची ऑडियो टेप जाहिर झाल्याने या घटनेची नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षानी पालिका सभागृहात केली. यावेळी विरोधी पक्षातील नगरसेवकांना बोलू दिले जात नसल्याने महापौराचा निषेध करण्यात आला. 


मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या मध्ये झालेल्या संभाषणाची ऑडियो टेप जाहिर झाल्या प्रकरणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आंबेरकर यांनी केले. या ऑडियो टेप मुळे पालिकेची आबरू वेशीवर टांगली असून नगरसेवकांकड़े बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या संवादातून महापौरानी पैसे वाट्पाचा बाजार मांडला होता.  असे वक्तव्य दूरध्वनीवरून करणे महापौरपदाला शोभत नाही असे सांगत महापौरानी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेसच्या नगरसेवकानी केली. 

विरोधी पक्षांकडून महापौरांच्या विरोधात फलक दाखवून नारे देवून सभागृहात गोंधळ घालण्यात आला. महापौर स्नेहल आंबेकर यांनी आपल्या विरोधात होत असलेल्या चर्चेमधून पळ काढण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकाना बोलूच दिले नाही. यामुळे सभागृहात आणखी गोंधळात भर पडली होती. या गोंधळातच कोणाला बोलायला द्यायचे कोणाला बोलायला द्यायचे नाही असे सांगत महापौरानी वेळ मारून नेत सर्व आरोप फेटालून लावत आपण निर्दोष असल्याचा खुलासा केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages