महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेप्रमाणे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी कॅशलेस कार्डची योजना लवकरच शालेय शिक्षण विभागामार्फत आणण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य कपिल पाटील, रामनाथ मोते, ॲड. निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम 101 अनुसार या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
तावडे म्हणाले की, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती योजना राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय यातील पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू आहे. गृह विभागांप्रमाणे कॅशलेस कार्ड योजना सुरू करताना या संदर्भातील काही निकषांचा अभ्यास करण्यात येत असून ही योजना लवकरात लवकर शालेय शिक्षण विभागा मार्फत आणण्यात येईल.