नवी दिल्ली : देशभरातील 'रोमिंग'चे दर कमी करण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) पावले उचलली आहेत. परिणामी आता 'रोमिंग'मध्ये असताना 'इनकमिंग कॉल'च्या दरात २३ टक्के आणि एसएमएस ४0 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. नव्या दराची अंमलबजावणी १ मे २0१५ पासून लागू होणार असून मोबाईल कंपन्यांना रोमिंगमध्ये असताना प्रतिमिनिट जास्तीत जास्त ४५ पैसे इतकाच दर आकारता येणार आहे.
मोबाईल सेवा पुरविणार्या कंपन्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही आता केवळ इंटरनेटपुरती र्मयादित झाली असून कॉल दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. बहुतांशी कंपन्यांनी नव्या स्पेक्ट्रम दरामुळे कॉल दरात भरमसाट वाढ केली असतानाच त्याचा रोमिंगमध्ये असणार्या ग्राहकांनादेखील फटका बसतो. आऊटगोईंग कॉलबरोबर इनकमिंगवर देखील छुपे दर आकारले जात असल्याचे ग्राहकांना होणारा तोटा लक्षात घेता आता ट्राय पुढे सरसावली आहे. कॉलबरोबर एसएमएस सेवादेखील स्वस्त करण्यासाठी कंपन्यांना भाग पाडले जाणार आहे. 'रोमिंग'मध्ये असताना 'इनकमिंग कॉल'च्या दरात २३ टक्के आणि एसएमएस ४0 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. नव्या दराची अंमलबजावणी १ मे २0१५ पासून लागू होणार असून मोबाईल कंपन्यांना रोमिंगमध्ये असताना प्रतिमिनिट जास्तीत जास्त ४५ पैसे इतकाच दर आकारता येणार आहे. होम सर्कलमध्ये असणार्या ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्यासाठी ट्रायने घेतलेल्या या निर्णयामुळे मोबाईल पुरवठादार सेवा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्थानिक कॉल १ रुपया प्रति मिनिट ८0 पैसे प्रति मिनिट
(ज्या शहरात असाल तेथील)
एसटीडी कॉल १.५0 रुपया प्रति मिनिट १.१५ रु. प्रति मिनिट
इनकमिंग कॉल ७५ पैसे प्रतिमिनिट ४५ पैसे प्रतिमिनिट
स्थानिक एसएमएस १ रुपया प्रति मेसेज २५ पैसे प्रति मेसेज
एसटीडी एसएमएस १.५0 रुपया प्रति मेसेज ३८ पैसे प्रति मेसेज