तांत्रिक कारणांमुळे उपनगरात पाणीपुरवठय़ाची समस्या - अतिरिक्त आयुक्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तांत्रिक कारणांमुळे उपनगरात पाणीपुरवठय़ाची समस्या - अतिरिक्त आयुक्त

Share This
मुंबई : पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात सुरू असलेल्या पाणीटंचाईचे पडसाद गुरुवारच्या स्थायी समिती बैठकीत उमटले. तांत्रिक कारणांमुळे ही समस्या उद्भवली आहे, अशी कबुली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी या वेळी दिली. 

ट्रॉम्बे भागात दररोज १३५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असताना गेल्या काही दिवसांपासून रोज फक्त १२९ दशलक्ष लिटर्स पाणी मिळत आहे. १९९५ नंतरच्या अनधिकृत झोपड्यांनाही पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाल्यानंतर २000 नंतरच्या बेकायदा झोपड्यांनाही पाणी देण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यामुळे, पाणीपुरवठय़ात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र सध्या देण्यात येणार्‍या पाण्यात कपात केली आहे. त्यातच पाणीटंचाई सुरू झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांचे हाल होत आहेत, असे काँग्रेसच्या वकारून्नीसा अन्सारी आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी सांगितले. वांद्रय़ातील काँग्रेसचे नगरसेवक असिफ झकेरिया यांनीही आपल्या भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याची समस्या जाणवत आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले, तर सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी 'आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या अँटॉप हिल परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. म्हाडा वसाहतीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली.

पुण्यातील लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची दररोजची गरज आहे तितक्या लिटर पाण्याची मुंबईत रोज गळती होत आहे, अशी धक्कादायक माहिती समितीला दिली. काही तांत्रिक कारणांमुळे उपनगरांत पाणीपुरवठा होत नसल्याचे देशमुख यांनी मान्य करताना ही समस्या लवकरच दूर केली जाईल, असे समितीला सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages