मुंबई / अजेयकुमार जाधव :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक इंदू मिल येथे उभारण्यात येत आहे. स्मारकाबाबत बाबासाहेबांच्या जयंती (१४ एप्रिल) आधी सर्व कागदपत्रांची पूर्तता करा, तांत्रिक अडचणी दूर करा, कागदपत्रांची पूर्तता करा नंतरच स्मारकाचे भुमिपूजन करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत केली आहे.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी रिपब्लिकन सेनेने ६ डिसेंबर, २0११ रोजी २४ दिवस मिलचा ताबा घेवून आंदोलन केले होते. या घटनेनंतर तत्कालीन केंद्र व राज्य सरकारला जाग आली होती. तसेच आंदोलनानंतर आंबेडकरी जनतेचे धुव्रीकरण सुरू झाले. त्यामुळेच अखेर सरकार झुकले, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले. मागील आघाडी सरकारने स्मारकासंदर्भात डिझाईन सुकाणू समितीला विश्वासात न घेता मंजूर केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत सुकाणू समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे आनंदराज यांनी सांगितले.
बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समता निर्माण करण्यासाठी खर्च केले आहे. बाबासाहेबांचे स्मारक उभे करावयाचे असल्यास ते समतेच्या आधारावरच उभे कराबे लागेल. या स्मारकामध्ये जास्तीत जास्त जागा मोकळी ठेवून त्यावर ६ डिसेंबर या महापारीनिर्वान दिनी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची सोय करता आली पाहिजे, त्या मध्ये भव्य असा स्ट्याच्यू ऑफ इक्व्यालिटीचा संदेश देणारा बाबासाहेबांचा पुतळा, बाबासाहेबांची पुस्तके, ग्रंथ, मेडीटेशन केंद्र, इत्यादी सुविधा निर्माण कराव्यात. या स्मारकामुळे लोकांना समता, बंधुत्व, स्वातंत्र्य व लोकशाही यांची ऊर्जा मिळत राहील असे आनंदराज यांनी सांगितले.
यावेळी आनंदराज यांनी स्मारकाची जागा केंद्र सरकारने राज्य सरकारच्या ताब्यात दिली याचे खरे श्रेय आंबेडकरी जनतेला जाते. स्मारकासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्यामुळेच केंद्र व राज्य सरकारला जाग आली असल्याचे प्रतिपादन आनंदराज यांनी केले.