विकास आराखड्यातील झालेल्या चुकांचा सुत्रधार कोण? तो जनतेसमोर आणा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विकास आराखड्यातील झालेल्या चुकांचा सुत्रधार कोण? तो जनतेसमोर आणा

Share This
ज्या विकास आराखड्याला मुंबईच्या सर्वस्तरांतून विरोध होता. तो विकास आराखडा रद्द करून  नव्याने विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्यशासनाने आज घेतला. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे आभार. या विकास आराखड्यामध्ये अपेक्षित उद्दीष्ट्ये साध्य झाली नाहीत. तसेच अनेक चूका होत्या आणि तो सर्वसमावेशक नव्हता. म्हणूनच या विकास आराखड्याला सर्व स्थारातून विरोध होत होता. मी मुंबईकरांचा हा आवाज विधानसभेत मांडला. मुंख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन तात्काळ मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली या समितीने तीन दिवसात प्राथमिक अहवाल ही दिला. आता नव्याने विकास आराखडा तयार होईल त्याचवेळी आता झालेल्या  चुका कुणामुळे झाल्या होत्या?त्याला जबाबदार कोण? या मागे कोण सुत्रधार आहे ही माहिती जनतेसमोर महापालिका प्रशासनाने उघड करावी. त्याची ही योग्य वेळ आहे असेही आमदार ऍड. शेलार यांनी म्हटले आहे.  तसेच याकामासाठी कन्सल्टन ला दिलेले पाच कोटी रूपये परत घ्या  अथवा कार्यवाही करणार काय असा सवाल  आमदार ऍड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. 


जनमानस लक्षात घेऊन काम करणारे हे सरकार असल्यामुळे  अत्यंत वेगाने मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. सुरवातीलाच भाजपाने मुंबईकरांना विश्वास दिला होता की मुख्यमंत्रीच मुंबईकरांना न्याय देतील. तो विश्वास खरा ठरला आहे.  त्यामुळे आता  महापालिकेने पूर्णपणे निर्दोष विकास आराखडा तयार करावा, आता झालेल्या चूका टाळाव्यात आणि लोकभावना समजून घेऊन सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा अशी अपेक्षा ही आमदार ऍड आशिष शेलार यांनी आपल्या प्रतिक्रीयेत व्यक्त केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages