वादग्रस्त विकास आराखडा हद्दपार - संजय निरुपम... - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वादग्रस्त विकास आराखडा हद्दपार - संजय निरुपम...

Share This
मुंबई महापालिकेने बनविलेल्या मुंबईच्या विकासाचा २०३४ साला पर्यंतच्या विकास आराखड्या मध्ये असलेल्या अनेक चुकां मुळे मुंबईचे नागरिक, गृहनिर्माण संस्था,सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे महाराष्ट्र शासनाने लादलेला विकास आराखडा २०१४-२०३४ आजरोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागे घ्यावा लागला. त्यांनी सुधारित विकास आराखडा ४ महिन्याच्या आत द्यावा,अशा सूचनाही बृहन्मुंबई महानगरपालिकेस दिल्या. 


मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच रद्द करण्यात आलेला विकास आराखडा कार्यालयीन बाबुनी कोणाशीही चर्चा न करता मुंबईच्या इमारती, रस्ते, खेळाची मैदाने, उद्ध्याने,पाण्याचे वाटप,वीज, अग्निशमन दल,आरोग्याच्या सोयीसुविधा यांचा विचार न करता बनविण्यात आला होता.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सूचित केले कि, पुढील मुंबई विकास आराखडा सर्व स्थरातील व तळागाळातील नागरिकांच्या वार्ड व जिल्हा पातळीवर समस्यांचा विचार करून तसेच सर्व गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था व राजकीय पक्ष यांच्याशी सविस्तर चर्चा करून तयार करावा.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages