मुंबईतील हॉटेलवाल्यांना हवी पहाटे ३ची डेडलाइन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील हॉटेलवाल्यांना हवी पहाटे ३ची डेडलाइन

Share This
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या 'नाईट लाईफ'चा प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारात खितपत पडला असताना हॉटेलवाल्यांनी आता हॉटेल्स, रेस्तराँ खुले ठेवण्याची 'डेडलाइन' पहाटे ३पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून २४ तास नाईट लाईफचा प्रस्ताव व्यवहार्य नसेल तर शहरातील हॉटेल्स, रेस्तराँ पहाटे ३ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास मुभा द्या, अशी विनंती 'इंडिया हॉटेल अँण्ड रेस्तराँ असोसिएशन'ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.
सद्यस्थितीत पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या शिफारसीनंतर 'नाईट लाईफ'ला मुभा दिली जाईल, अशा काही ठिकाणांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. 'इंडिया हॉटेल अँण्ड रेस्तराँ असोसिएशन'ने सरकारला मद्यपानासाठी असलेली परमिट प्रणाली रद्द करण्याचीही विनंती केली आहे. रात्रीच्या वेळी पर्यटक तसेच नागरिकांच्या रहदारीवर काही निर्बंध, मॉल्स आणि एंटरटेन्मेंट झोन्सच्या माध्यमातून पर्यटन विकास, काही महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी सूचना असोसिएशनने केल्या आहेत. खाद्यपदार्थ आणि दारू विक्री रात्रभर सुरू ठेवण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मान्य केला असला तरी अन्य विविध मंजुर्‍यांची प्रतीक्षा असल्यामुळे प्रस्तावाची अंमलबजावणी होणे बाकी आहे. 'नाईट लाईफ'च्या प्रस्तावावर राज्य सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे दिसून आल्यानंतरच हॉटेल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages