मुंबई : मुंबईच्या उपनगरी लोकल गाड्यांतून दरदिवशी लाखो प्रवासी ये-जा करतात. याच गर्दीचा सध्या पाकीटमार्यांकडून चांगलाच लाभ उठवला जाऊ लागला आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत पाकीटमार्यांनी तब्बल १.८३ कोटींची रक्कम लंपास केल्याचे उजेडात आले आहे. ही रक्कम गतवर्षीच्या तीन महिन्यांच्या तुलनेत दुप्पटीने अधिक आहे.
जानेवारी ते मार्च २0१५ मध्ये पाकीट आणि बॅग चोरीच्या ३१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या तीन महिन्यांच्या अवधीत २७३ गुन्हे नोंद झाले होते. मोबाइल चोरीच्या घटनांतही लक्षणीय वाढ झाली आहे. तब्बल १ कोटी १0 लाख किमतीचे ५0५ मोबाइल फोन चोरीला गेल्याचे रेल्वे पोलिसांच्या दफ्तरी नोंद आहे. गतवर्षी ६१.११ लाखांच्या ३५१ फोनची चोरी झाली होती. लोकल फेर्या आणि रेल्वे स्थानकांच्या आवारात सक्रिय झालेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. रेल्वे स्थानकांच्या आवारात छोट्या-मोठय़ा चोर्या करताना जाळ्यात सापडलेल्या चोरट्यांची माहिती रेल्वे पोलीस गोळा करत आहेत.
पाकीट आणि बॅग लंपास करण्याच्या गुन्ह्यांत चिंतनीय वाढ झाल्यामुळे रेल्वे पोलीस आता दरदिवशी प्रवास करणार्या जवळपास ८0 लाख प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक खबरदारी बाळगू लागले आहेत. रेल्वे पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आघाडीच्या १0 गुन्हेगारांची यादी बनवण्यास सुरुवात केली आहे. या यादीत सराईत गुन्हेगारांची नावे अंतर्भूत राहणार असून पोलीस त्यांच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचे रेल्वे पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी सांगितले.