अतिधूम्रपान करण्यामुळे दरवर्षी २१ लाख लोकांना क्षयरोगाची लागण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अतिधूम्रपान करण्यामुळे दरवर्षी २१ लाख लोकांना क्षयरोगाची लागण

Share This
नवी दिल्ली : अतिधूम्रपान करण्यामुळे देशात दरवर्षी तब्बल २१ लाख लोकांना क्षयरोग अर्थात टीबीची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने पुराव्यासह शुक्रवारी लोकसभेत दिली. क्षयरोग जडलेल्या लक्षावधी लोकांना मोफत उपचार देण्यात येत असल्याचे सरकारने सांगितले.

एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, भारताची जवळपास ४0 टक्के लोकसंख्या टीबीच्या विषाणूंनी ग्रस्त आहे. या विषाणूंमुळेच मानवाला क्षयरोगाची बाधा होत आहे. भारतात दरवर्षी २१ लाख लोकांना नव्याने टीबीची लागण झाल्याची प्रकरणं उजेडात येत असल्याचे नड्डा यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत सांगितले. टीबी रोखण्यासाठी सरकारने व्यापक पातळीवर उपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. क्षयरोग्यांना मोफत औषधी देण्याचीही उपाययोजना यात सामील आहे. नड्डा पुढे म्हणतात की, दर एक लाख लोकसंख्येमागे वैद्यकीय निदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तर आदिवासीबहुल भाग आणि दुर्गम क्षेत्रात प्रत्येकी ५0 हजार लोकसंख्येमागे अशा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत देशात १३ हजार सूक्ष्मदर्शक केंद्र स्थापन आहेत. जवळपास सहा लाख उपचार केंद्र हे क्षयरोगी लोकांच्या रहिवाशी भागात उपलब्ध आहेत. या केंद्रांमध्ये सर्व शासकीय रुग्णालये, सामुदायिक व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, सेवाभावी संस्थांचे आरोग्य केंद्र आदींचा समावेश आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या काही सदस्यांचा दावा फेटाळत तंबाखू सेवनाचा कर्करोगाशी थेट संबंध असल्याचेही जे. पी. नड्डा यांनी संसदेत म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages