मुंबई : महापालिका संचालित सर्व जलतरण तलावांमध्ये डॉक्टर्सची नेमणूक करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीला सांगितले.
दादर येथील महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात जीवरक्षक आणि जलतरण निर्देशक, सुरक्षारक्षक आणि साफसफाई सेवा पुरवण्याच्या प्रस्तावावर समितीमध्ये बरीच चर्चा झाली. १ एप्रिल २0१२ ते ३१ मार्च २0१४ या कालावधीसाठी हे काम करण्यासाठी 'मे. क्लोरिनेशन इंजिनीअरिंग' यांची एक कोटी २0 लाख एवढय़ा किमतीने कामे करण्यासाठी नियुक्ती केली होती. या कंत्राटाचा कालावधी ३१ मार्च १४ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर ही सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी १ एप्रिल २0१४ रोजी तांत्रिक खंड देऊन २ एप्रिल २0१४ ते ३१ मे २0१५ किंवा नवीन कंत्राटदारांची नियुक्ती होईपर्यंतच्या या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी ६८ लाख ५७ हजार ६३३ रुपये या कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत. त्याला स्थायी समितीची मंजुरी देण्याचा प्रस्ताव समितीपुढे मांडण्यात आला असता, सदस्यांनी प्रशासनावर जलतरण तलावांवर असलेल्या समस्यांसंबंधी वाचा फोडली.
या तलावाच्या मोकळ्या परिसरात बाहेरच्या लोकांची वाहने पार्क केली असूनही, पालिकेचे सुरक्षारक्षक त्याकडे लक्ष देत नाहीत तसेच तेथे साठणारा कचरा नियमित हटवला जात नसून, तेथील पुतळ्यावर धूळ साचली असताना तीदेखील पुसली जात नाही. येथे सुरक्षारक्षकांची तसेच सफाई कर्मचार्यांचीही संख्या वाढवा, अशी मागणी त्यांनी केली. मनसेचे सुधीर जाधव यांनी अलिकडेच घाटकोपरच्या जलतरण तलावात एक तरुणी बुडून मृत्यू पावली, याचा विचार करता, जलतरण तलावांवर डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली.