गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात प्लाझ्मा सेंटर कधी सुरू करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात प्लाझ्मा सेंटर कधी सुरू करणार

Share This
मुंबई : गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात प्लाझ्मा सेंटर सुरू करण्यास मंजुरी मिळाली असतानाही, अजून हे सेंटर का कार्यान्वित झालेले नाही. सेंटर कधी सुरू करणार असा प्रश्न शिवसेनेच्या नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. 


शताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपूर्वी 'एमआरआय' सुविधा सुरू करण्यात आली, पण तेथे दाखल झालेल्या एका बालकाचे 'एमआरआय' झाले नाही, या गंभीर बाबीकडे त्यांनी समितीचे आणि अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांचे लक्ष वेधले. तेथे 'एमआरआय' सुरू तरी आहे का, असेही त्यांनी खडसावून विचारले. या रुग्णालयात येणारे वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह-एमआर) त्यांच्या कंपन्यांच्या विविध औषधांची सूची येथील डॉक्टरांना लिहून देतात आणि संबंधित डॉक्टर्स या 'एमआर'नीच लिहून दिलेली औषधे रुग्णांना बाहेरच्या केमिस्टकडून आणण्यास भाग पाडतात. या प्रकरणाची त्रयस्थामार्फत तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली. अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages