मुंबई : चर्चगेट आणि सीएसटी रेल्वे स्थानकांना जोडून असणार्या सबवेचे पालिका आगामी काळात नूतनीकरण करणार आहे. तसेच सायन सबवेचीही दुरुस्ती हाती घेतली आहे. माहीम येथील सबवेचे बांधकाम योग्यरीत्या न झाल्यामुळे तो बंद करून त्या जागी पादचारी पूल उभारण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे.
चर्चगेट आणि सीएसटी सबवेमध्ये दुकाने थाटण्यात आल्यामुळे रस्ता आक्रसला आहे. पालिकेने या दोन्ही सबवेंच्या देखभालीची जबाबदारी संबंधित दुकानदारांना दिली आहे. मात्र दुकानदारांकडून देखभाल योग्यरीत्या होत नसल्यामुळे पालिकेने स्वत:हून सुशोभिकरण हाती घेतले आहे. गेले वर्षभर रखडलेल्या सुशोभिकरणासाठी पालिका सहा महिन्यांत १५ कोटींची निविदा काढणार आहे. वर्षाच्या अखेरीस कंत्राटदाराची निवड करून सुशोभिकरणास सुरुवात होईल. चर्चगेट आणि सीएसटी स्थानके हेरिटेज यादीत मोडत असल्यामुळे हेरिटेज समितीकडे या संबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सुशोभिकरणात सबवेंना हेरिटेज लूक देण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय सबवेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीही बसवण्यात येणार आहेत.